करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. जगभरात सुमारे दीड लाखांहून अधिक लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे जवळपास ७८ हजार लोक करोनातून पूर्णपणे बरे झाले असल्याची माहिती आहे. त्यामुळे योग्य ती काळजी आणि उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, यावर साऱ्यांचा विश्वास असून भारतातही याबाबत जनजागृती केली जात आहे. या दरम्यान, भारताची फुलराणी सायना नेहवाल हिने आपल्या चाहत्यांना खास संदेश दिला आहे.

“स्मिथ धाडकन जमिनीवर कोसळला आणि…”; वॉर्नरने सांगितली आपबिती

“अत्यंत सावधनता बाळगा आणि घरातच राहा. पुढच्या दोन आठवड्याचा कालावधी हा भारतासाठी अत्यंत नाजूक आणि कसोटीचा असणार आहे. इतर देशांनी करोनाबाबत काय सावधनता बाळगली आणि कशाप्रकारे करोनाचा सामना केला ते नीट समजून घ्या आणि त्यानुसार स्वत:च्या परिसरात सावधनता बाळगा”, असा संदेश सायना नेहवालने दिला.

याआधी, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी भारतीयांना खास संदेश दिला आहे. रोहितनेही चाहत्यांना स्वतःसह इतरांचीही काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सध्याचे दिवस सर्वांसाठी अत्यंत आव्हानात्मक आहेत. जगभरात करोना व्हायरसने धूमाकूळ घातला आहे. करोनावर मात करण्यासाठी सर्वांनी जागरूकपणे एकत्रित प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपल्या आजुबाजुला काय चाललंय, यावर आपलं बारीक लक्ष पाहिजे. जर कोणाला या रोगाची लक्षणे दिसल्यास त्याने त्वरीत नजीकच्या रुग्णालयाला कळवलं पाहिजे, असा संदेश रोहितने व्हिडीओच्या माध्यमातून दिला.

तर, करोना आजाराचा धोका टाळण्यासाठी सरकारकडून विविध उपययाोजना करण्यात येत असून नागरिकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. साऱ्यांनी खंबीर आणि कणखर राहा, असे आवाहन भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही ट्विटरद्वारे केले होते. करोनाविरुद्ध लढा देऊ, असा संदेश कोहलीने दिला आहे.

Story img Loader