करोनाच्या दुसऱ्या लाटेशी देशवासियांचा लढा अजून सुरुच आहे. मात्र, गेल्या दीड वर्षापासून करोनाशी सतत दोन हात करणाऱ्या भारतीयांसाठी ही आकडेवारी नक्कीच दिलासादायक ठरेल. देशातला रुग्ण बाधित आढळण्याचा दैनंदिन दर सलग २५ व्या दिवशी तीन टक्क्यांच्याही खाली आहे. तर साप्ताहिक दर पाच टक्क्यांच्या खालीच असून स्थिर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात काल दिवसभरात ३८ हजार ९४९ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे देशातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या आता ४ लाख ३० हजार ४२२ वर पोहोचली आहे. देशातला रुग्ण बाधित आढळण्याचा साप्ताहिक दर सातत्याने पाच टक्क्यांच्या खालीच असून सध्या हा दर २.१४ टक्क्यांवर स्थिर आहे. तर रुग्ण बाधित आढळण्याचा दैनंदिन दर गेल्या सलग २५ दिवसांपासून तीन टक्क्यांच्या खालीच म्हणजे १.९९ टक्के इतका आहे.

काल दिवसभरात देशातले ४० हजार २६ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे आत्तापर्यंत करोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता तीन कोटी एक लाख ८३ हजार ८७६ वर पोहोचली आहे. तर देशातला करोना रुग्ण बरे होण्याचा दर वाढून ९७.२८ टक्क्यांवर स्थिरावला आहे.

देशात काल दिवसभरात करोनामुळे ५४२ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा आता ४ लाख १२ हजार ५३१ वर पोहोचला आहे. देशाचा करोना मृत्यूदर आता १.३३ टक्क्यांवर पोहोचला आहे.

देशातली करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमही वेगात सुरू आहे. देशात काल दिवसभरात ३८ लाख ७८ हजार ७८ नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस घेतली. त्यापैकी पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या २५ लाख १ हजार ९९० इतकी असून १३ लाख ७६ हजार ८८ नागरिकांनी करोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला. त्यामुळे लस घेतलेल्या भारतीयांची एकूण संख्या आता ३९ कोटी ५३ लाख ४३ हजार ७६७ वर पोहोचली आहे.