करोना विषाणूंचा संसर्ग झाल्यामुळे देशभरात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात करोना बाधितांची एकूण संख्या ६४९ आहे. त्यात ५९३ जण अजूनही करोना पॉझिटिव्ह आहेत. ४२ जण करोना मुक्त झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी दिली. जगभरातील करोनाग्रस्तांची संख्या ४ लाख ६० हजारांहून अधिक झाला आहे. तर मृतांची संख्या २० हजारहून अधिक झाली आहे. असं असताना भारतामध्येही करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सरकारने संपूर्ण देशच २१ दिवस लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला असून २५ मार्च ते १४ एप्रिल या काळामध्ये देशामध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. देशातील करोनाग्रस्तांची संख्या वाढेल अशी भिती व्यक्त केली जात असतानाच एका वरिष्ठ डॉक्टरने मात्र वेगळाच अंदाज व्यक्त केला आहे. देशातील करोनाग्रस्तांची संख्या वाढली तरी भारतामध्ये करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचा आकडा वाढणार नाही असा अंदाज इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (आयसीएमआर) माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि एम्स रुग्णालयाचे इम्युनोलॉजीचे माजी प्रमुख डॉक्टर नरिंदर मेहरा यांनी व्यक्त केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा