देशभरात करोना व्हायरसचा फैलाव दिवसेंदिवस वाढत असून दररोज करोना व्हायरसची लागण झालेल्यांच्या संख्येत वाढ होतेय. बुधवारी (दि.२६) करोनाची लागण झालेल्यांचा आकडा ६०० पार पोहोचला. अशातच, दिल्लीच्या मोहल्ला क्लिनिकमधील एका डॉक्टरांना करोना व्हायरसची लागण झाल्याचं वृत्त आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

याबाबत माहिती मिळताच केजरीवाल सरकारने १२ मार्च ते १८ मार्चपर्यंत त्या मोहल्ला क्लिनिकमध्ये उपचारासाठी किंवा तपासणीसाठी गेलेल्या रुग्णांनी स्वतःला होम क्वारंटाइन करावे अशाप्रकारचे आवाहन करणारी नोटीस परिसरातील भितींवर लावली आहे. आम आदमी पक्षाने ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली असून “मोहल्ला क्लिनिक, मौजपुर, दिल्ली येथील डॉक्टरांना करोनाची लागण झाली आहे….जे रुग्ण १२ मार्च ते १८ मार्च या दरम्यान उपचारासाठी मौजपूर येथील त्या मोहल्ला क्लिनिकमध्ये गेले होते त्यांनी पुढील १५ दिवसांसाठी स्वतःला होम क्वारंटाइन करावे….” अशाप्रकारची नोटीस केजरीवाल सरकारने जारी केली आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्लीतल्या एका मोहल्ला क्लिनिकमध्ये दररोज जवळपास १५० ते २०० रुग्ण येत असतात. १२ ते १८ मार्च या दरम्यान एक रविवार होता, रविवारी मोहल्ला क्लिनिक बंद असते. त्यामुळे सहा दिवसांमध्ये जवळपास १००० रुग्ण त्या मोहल्ला क्लिनिकमध्ये आले असावेत असा अंदाज वर्तवला जातोय. या रुग्णांनाही संसर्ग होण्याचा धोका आहे, परिणामी त्यांनी स्वतःला घरातच क्वारंटाइन करावे असे आवाहन केजरीवाल सरकारकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, देशात करोना व्हायरसची लागण झालेल्यांचा आकडा बुधवारी (दि.२५) ६०० पार पोहोचलाय. तर, आतापर्यंत १२ जणांचा या व्हायरसमुळे मृत्यू झालाय.