आंध्र प्रदेशमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. विजयवाडा येथील रुग्णालयात एका ७० वर्षीय महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला होता. १५ मे रोजी तिच्या पतीने पॉलिथीनमध्ये असलेला पत्नीचा मृतदेह पुरला. त्यानंतर १ जून रोजी कुटुंबाने शोकसभा आयोजित केली होती. पण दुसऱ्याच दिवशी ती ७० वर्षीय महिला घरी परतल्याने कुटुंबियांची झोपच उडाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यातील ख्रिश्चनपेठ गावात ही घटना घडली आहे. वृद्ध असणाऱ्या गिरिजाम्मा यांना करोनाची लागण झाल्यानंतर १२ मे रोजी विजयावाडाच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांचे पती नियमितपणे रुग्णालयात पाहण्यासाठी जात होते. १५ मे रोजी त्यांना त्यांची पत्नी कोविड वॉर्डमध्ये नसल्याचे लक्षात आलं. त्यांनी इतर वॉर्डमध्येही तपास केला मात्र गिरिजाम्मा यांचा पत्ता लागला नाही. त्यावेळी तिथल्या परिचारिकांना गिरिजाम्मा यांचा मृत्य झाला असावा असे त्यांना सांगितले.

त्यानंतर त्यांना रुग्णालयाने शवगृहातून पॉलिथीनमध्ये गुंडाळलेला एक मृतदेह त्यांच्या हाती सोपवला. पत्नीचा मृत्यू झाल्याचे कळल्यानंतर पती गद्दाया यांनी मृतदेह गावी आणला. कोविडच्या नियमांनुसार गद्दाया यांनी त्यांच्या पत्नीवर त्याच दिवशी अंत्यसंस्कार केले. करोनाच्या भीतीने रुग्णालयातून पॉलिथीनमध्ये गुंडाळून दिलेला मृतदेह कुटुंबियांनी उघडून पाहिला नाही आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार करुन टाकले. २३ मे रोजी त्यांच्या मुलाचा देखील करोनामुळे खम्मम येथील जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला होता.

आणखी वाचा- बापरे! एकाच रुग्णाला व्हाइट, ब्लॅक, यल्लो फंगसचा संसर्ग; तीन तास सुरु होतं ऑपरेशन

कुटुंबाने १ जून रोजी दोघांसाठी एका शोकसभेचे आयोजन केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गिरिजम्मा घरी परतल्या. त्यांना पाहून सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर दुसऱ्या कोणत्या तरी मृतदेहाचे अंत्यसंस्कार केल्याचे गद्दाया आणि गावकऱ्यांच्या लक्षात आले. या सर्व प्रकरणाची माहिती नसलेल्या गिरिजम्मा करोनातून बरे झाल्यानंतरही कोणी आपल्याला घ्यायला आलं नाही यामुळे दुखीः होत्या. एकटे घरी येण्यासाठी त्यांनी करोना रुग्णांना मदत म्हणून देण्यात येणाऱ्या ३००० रुपये खर्च करुन त्या घरी आल्याचे त्यांनी सांगितले.