जगभरामध्ये करोना विषाणूचा संर्सग वाढत असताना देशामध्येही करोनाग्रस्तांची संख्या दिवसोंदिवस वाढतानाचे चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर करोनाचा फैलाव थांबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी संध्याकाळी बुधवारपासून २१ दिवस संपूर्ण देशात लॉकडाउन असेल अशी घोषणा केली. त्यामुळे १४ एप्रिलपर्यंत सर्वांनी घरातच बसावे असं आवाहन मोदींनी केलं आहे. करोनाची संक्रमण श्रृंखला तोडण्यासाठी हा २१ दिवसाच्या लॉकडाउनचा निर्णय घेण्यात येत असल्याचेही मोदींनी स्पष्ट केलं. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिलेल्या आकडेवारी लॉकडाउनचा निर्णय घेतल्यानंतर करोनाग्रस्तांची संख्या कमी प्रमाणात वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. बुधवारी दुपारी बारावाजेपर्यंत करोनाग्रस्तांची संख्या मंगळवारच्या तुलनेत ५७ ने वाढला. बुधवारी दुपारी देशामध्ये ५३९ करोनाग्रस्त रुग्ण होते. हीच संख्या मंगळवारी ६७ ने वाढला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा