Coronavirus Omicron India Updates: देशातल्या करोना रुग्णसंख्येत काल दिवसभरात पुन्हा वाढ नोंदवण्यात आली. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी दैनंदिन नव्या करोनाबाधितांची संख्या ६.८ टक्क्यांनी वाढली आहे. मात्र दिलासादायक गोष्ट अशी की आज सलग दुसऱ्या दिवशी करोनाच्या दोन लाखांपेक्षा कमी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. त्यासोबतच उपचाराधीन रुग्णसंख्याही एक लाखांच्या खाली आहे. मात्र केरळमधली रुग्णसंख्या चिंताजनक आहे.
करोनाच्या तिसऱ्या लाटेत केरळ संसर्गाचा केंद्रबिंदू ठरला आहे. तिथे रुग्णसंख्येत फारशी घट दिसत नाही. गेल्या काही दिवसांपासून केरळमधली रुग्णसंख्या ५० हजारांच्या वरच आहे. काल दिवसभरात केरळमध्ये करोनाच्या नव्या ५२ हजार १९९ रुग्णांची नोंद झाली. तर २९ रुग्णांचा मृत्यू झाला. केरळसोबतच महाराष्ट्रातही करोना रुग्णसंख्येत वाढ नोंदवली गेली आहे. काल दिवसभरात राज्यात १८ हजार ६७ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली असून ७९ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईत काल दिवसभरात १ हजार १२१ करोनाबाधितांची नोंद झाली असून १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Covid-19 India Updates: करोनाच्या तिसऱ्या लाटेत केरळ संसर्गाचा केंद्रबिंदू ठरला आहे. तिथे रुग्णसंख्येत फारशी घट दिसत नाही. गेल्या काही दिवसांपासून केरळमधली रुग्णसंख्या ५० हजारांच्या वरच आहे.
दहावी बारावीच्या परीक्षा आता ऑनलाईन नव्हे तर ऑफलाईनच होणार असून त्यासाठी करोना प्रतिबंधक लस घेणं बंधनकारक नसल्याचं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आलं आहे. दहावीची लेखी ऑफलाइन परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान होणार आहे. त्याची तोंडी परीक्षा २५ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२ दरम्यान होणार आहे. तर बारावीची लेखी परीक्षा ४ ते ३० मार्च दरम्यान होणार असून १४ ते ३ मार्च तोंडी परीक्षा होईल
करोनामुळे निर्माण झालेले ऑनलाइन परीक्षांचे सत्र दीड वर्षे उलटल्यानंतरही मुंबई विद्यापीठाच्या अंगवळणी पडलेले नाही. नुकत्याच पार पडलेल्या पदव्युत्तर सत्र परीक्षांमध्ये अनेक विभागांत परीक्षेचा गोंधळ उडाला होता. विद्यापीठातील सत्र परीक्षांवर परीक्षा विभागाचे नियंत्रण नसल्याने अनेक समस्या निर्माण होत असल्याचे प्राध्यापक संघटनेचे म्हणणे आहे.
करोनाच्या तिसऱ्या लाटेचा संसर्ग आटोक्यात आल्यानंतर २४ जानेवारीपासून मुंबईतील विविध माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या पूर्वप्राथमिक ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या असल्या तरी अजूनही पालकांकडून पुरेसा प्रतिसाद मिळालेला नाही. मुंबईतील पालिकेच्या, खासगी व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचा विचार करता केवळ ४८ टक्के पालकांनी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे संमतिपत्र दिले असून प्रत्यक्षात ३४ टक्के विद्यार्थीच शाळेत उपस्थित राहत असल्याचे आढळून आले आहे.
सर्वाधिक करोना रुग्णसंख्या नोंदविणारी पाच राज्ये खालीलप्रमाणे:
केरळ - ५२,१९९
कर्नाटक - २०,५०५
महाराष्ट्र - १८,०६७
तामिळनाडू - १४,०१३
गुजरात - ८,९३४
देशात काल दिवसभरात ५५ लाख १० हजार ६९३ नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. त्यापैकी पहिला डोस घेतलेल्या १८ वर्षांवरील नागरिकांची संख्या ८ लाख ९५ हजार, ७१३ असून दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या २६ लाख ५७ हजार १९२ आहे. देशातल्या १५ ते १८ वर्षे वयोगटातल्या करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ५ लाख ९ हजार ७५४ असून १० लाख ८ हजार ४९१ मुलांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. वर्धक मात्रा घेतलेल्या नागरिकांची संख्या ४ लाख ३९ हजार ५४३ इतकी आहे.
देशातली गेल्या २४ तासांतली करोना आकडेवारी खालीलप्रमाणे:
नवे करोनाबाधित - १, ७२, ४३३
मृतांची संख्या - १,००८
बरे झालेले रुग्ण - २,५९, १०७
उपचाराधीन रुग्णसंख्या - १५, ३३, ९२१
रुग्ण बाधित आढळण्याचा दैनंदिन दर - १०.९९%
केरळसोबतच महाराष्ट्रातही करोना रुग्णसंख्येत वाढ नोंदवली गेली आहे. काल दिवसभरात राज्यात १८ हजार ६७ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली असून ७९ रुग्णांचा मृत्यू झाला.