देशात गेल्या २४ तासांमध्ये करोनाचे ३१५७ नवे रुग्ण आढळले आहेत. यासोबत देशातील करोनाबाधितांची रुग्णसंख्या ४ कोटी ३० लाख ७९ हजार १८८ वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १९ हजार ५०० इतकी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान देशात रविवारी ४० जणांचा करोनाने मृत्यू झाला. यासोबत आतापर्यंत करोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ५ लाख २३ हजार ८४३ इतकी झाली आहे.

दरम्यान शनिवारी देशात करोनाचे ३६८८ रुग्ण आढळले होते. तर ५० जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. शनिवारच्या तुलनेत रविवारी आढळलेली रुग्णसंख्या पाच टक्क्यांनी कमी आहे.

भारतात करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांमध्ये दिल्ली पहिल्या क्रामांकावर आहे. दिल्लीमध्ये १४८५ नवे रुग्ण आढळे आहेत. तर हरियाणात ४७९, केरळमध्ये ३१४, उत्तर प्रदेशमध्ये २६८ आणि महाराष्ट्रात १६९ नवे रुग्ण आढळले आहेत.

भारतात रविवारी आढळलेल्या रुग्णसंख्येपैकी ८६.० टक्के रुग्ण या पाच राज्यांमधील आहेत. एकट्या दिल्लीत ४७.४ टक्के रुग्ण आढळले आहेत. भारतात रिकव्हरी रेट ९८.७४ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या २४ तासात २७२३ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४ कोटी २५ लाख ३८ हजार ९७६ झाली आहे.