देशभरामध्ये करोना विषाणूच्या संसर्गासंदर्भात अनेक अफवा पसरवल्या जात असतानाच आंतरराष्ट्रीत स्तरावरील प्रसिद्ध आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर, डी. नागेश्वर रेड्डी यांनी भारतीयांना दिलासा देणारी एत बातमी दिली आहे. करोनाविरुद्धची लढाई भारत आरामात जिंकेल असा विश्वास रेड्डी यांनी व्यक्त केला आहे. लॉकडाउनचा कालावधी हा तीन ते चार आठवड्यांपेक्षा अधिक हवा होता, अशी इच्छाही रोड्डी यांनी व्यक्त केली आहे. रेड्डी हे सध्या एशियन इन्स्टीट्यूट ऑफ गॅस्ट्रोइंन्ट्रोलॉजीचे अध्यक्ष असून २०१६ साली त्यांना पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
डॉक्टर रेड्डी यांनी न्यू इंडियन एक्सप्रेसला विषेश मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये भारत करोनाविरुद्धची लढाई कशी जिंकेल यासंदर्भात माहिती देताना त्यांनी दोन प्रमुख कारणांचा उल्लेख केला. सध्याची एकंदरित परिस्थिती भारतासाठी अनुकूल असल्याचे रेड्डी यांनी म्हटलं आहे. करोना विषाणूची उत्पत्ती आणि त्याचे संक्रमण होण्याचा अभ्यास केल्यास डिसेंबरमध्ये चीनमधील वुहान शहरामध्ये पहिल्यांदा करोनाची उत्पत्ती झाली त्यानंतर हा विषाणू इटली, अमेरिका आणि युरोपमधील पाश्चिमात्य देशांमध्ये वेगाने पसरला. त्यानंतर दोन तीन आठवड्यांनी हा विषाणू या देशामधून भारतामध्ये दाखल झाला. करोना हा एक आरएनए प्रकारातील विषाणू आहे अशी माहिती रेड्डी यांनी दिली. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्याप्रमाणे मानवी पेशींची रचना डीएनएवर अवलंबून असते तशाच प्रकारे काही विषाणूंची रचना आरएनएवर आधारित असते.
नक्की वाचा >> मोदी सरकारच्या ‘लॉकडाउन’च्या निर्णयाचा पहिल्याच दिवशी दिला परिणाम
मानवाला करोनाचा संसर्ग वटवाघूळांमुळे झाल्याचे बोललं जातं. मात्र थेट वटवाघूळामधून मानवाला संसर्ग झाल्याचे ठामपणे सांगता येणं कठीण आहे. मात्र सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की चीनमधून इटली, अमेरिका आणि भारतामध्ये पसरलेल्या करोना विषाणूचा जीनोटाइप म्हणजेच प्रजोत्पत्तिविषयक गुणधर्म वेगळे आहेत. या विषाणूच्या जनुकीय रचनेचा (जीन्स सीक्वेन्सींग) चार देशामध्ये अभ्यास करण्यात आला. अमेरिका, इटली, चीन आणि भारतातील विषाणूंचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासामधून समोर आलेल्या निरिक्षणांबद्दल बोलताना डॉ. रेड्डी यांनी इटली आणि भारतामधील करोना विषाणूचा जीनोम (जनुकीय संरचना) वेगळा आहे. भारतामधील करोना विषाणूच्या जीनोममध्ये हा स्पाइक प्रोटीनचा एकच उत्परिवर्तन (उत्परिवर्तन म्हणजे एखादा विषाणू मानवी पेशींना जोडला जाऊन त्या पेशींमध्ये बदल घडवून आणण्याची प्रक्रिया ) अढळून आले आहे. स्पाइक प्रोटीनच्या आधारेच हा विषाणू मानवी पेशींना जोडला जातो. त्यामुळेच जीनोममधील हा फरक भारतासाठी फायद्याचा ठरणार आहे.
नक्की वाचा >>“भारतामध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्यास घाबरण्यासारखं काही नाही; कारण एप्रिल संपेपर्यंत….”
इटलीमधील संक्रमण झालेल्या करोना विषाणूमध्ये तीन उत्परिवर्तन अढळून आले आहेत. त्यामुळे येथील विषाणू हा रुग्णांसाठी अधिक घातक आहे. इटलीमध्ये करोनाने थैमान घालण्याची इतरही कारणे आहेत. ज्यामध्ये करोनाचे रुग्णांचे वय ७० ते ८० दरम्यान अशणे, धुम्रपान, दारुचे मोठ्या प्रमाणात सेवन, मधुमेह, रक्तदाब यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. त्यामुळेच इटलीमध्ये करोनामुळे मृत्यू झालेल्यांचे प्रमाण जगभरातील मृत्यूदरापेक्षा १० टक्क्यांनी अधिक आहे. तर भारत, अमेरिका आणि चीनमध्ये मृत्यूदर अगदी दोन टक्के इथका आहे. विषाणूच्या जीनोममुळेच मृत्यूदर आणि संक्रमणाच्या शैलीमध्ये बदल दिसून येत आहे. करोनाचा संसर्ग कसा होतो याचा अभ्यास करताना रोगप्रतिकारकशक्तीचाही विचार केला जातो.
फोटोगॅलरी >> करोनाने इटलीत का घेतले इतके बळी?; जाणून घ्या २० महत्वाच्या गोष्टी
नक्की वाचा >> Coronavirus: जो मूर्खपणा इटली, जर्मनी, स्पेन व अमेरिकेच्या नागरिकांनी केला तोच भारतीय करतायत
करोनाच्या रुग्णांची संख्या दिवसोंदिवस वाढत असल्याने देशामध्ये भीतीचे वातावरण आहे. यासंदर्भात बोलताना डॉ. रेड्डी यांनी, अनेक अभ्यासांमध्ये दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांवर करोनाचा फारसा परिणाम होत नाही असा दावा करण्यात आल्याचे सांगितले. तसेच तरुणांवरही करोनाचा तितका प्रभाव होत नाही. सामान्यपणे ७० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना त्यातही मधुमेह, उच्च रक्तदाब, कॅन्सर असे आजार असणाऱ्यांना करोनाचा सर्वाधिक धोका आहे, असं अनेक अभ्यासांमध्ये दिसून आल्याचं रेड्डी यांनी सांगितलं आहे.