सध्या सारं जग करोना व्हायरसच्या विळख्यात अडकलं आहे. जगभरात भीतीचे वातावरण आहे. सुमारे दोन लाखांहून अधिक लोकांना करोनाचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. भारतातदेखील विविध स्तरावर आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे अनेक लोक करोनातून पूर्णपणे बरे झाले असल्याची माहिती आहे. त्यामुळे योग्य ती काळजी आणि उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, यावर साऱ्यांचा विश्वास असून भारतातही याबाबत जनजागृती केली जात आहे. पोलीसदेखील २४ तास जागता पाहारा देत आहेत.
“हनुमानजी तर Amazon, Flipkart पेक्षाही फास्ट”; वाचा नेटिझन्सच्या भन्नाट कमेंट्स…
डॉक्टर, वैद्यकीय सेवा आणि पोलीस हे करोनापासून साऱ्यांचे रक्षण करण्यासाठी दिवस-रात्र एक करत आहेत. पण असे असताना काही नागरिक मात्र डॉक्टर्स आणि पोलिसांवरच हल्ले करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तबलिगी जमातच्या लोकांनी उपचार करणाऱ्या डॉक्टर्सवरच हल्ले केले. याशिवाय काही वाटसरूंनी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांशी हुज्जत घातली. काही लोक त्यांच्याबाबत अपशब्द उच्चारताना पाहायला मिळत आहेत. अशा नागरिकांच्या कृत्याचा भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीन याने तीव्र शब्दात निषेध केला आहे.
क्रिकेटच्या मैदानावरील सौंदर्यवती… सिनेतारकाही पडतील मागे!
“जे लोक डॉक्टर्स आणि पोलीस यांच्यावर हल्ले करत आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जायला हवी. जेव्हा डॉक्टर स्वत: हा व्यवसाय निवडतात, तेव्हा ते इतरांचा जीव वाचवण्याची शपथ घेतात. ते त्यांचं काम करत आहेत. अशा वेळी जर कोणी त्यांच्यावर हल्ला करत असेल, तर मात्र त्या नागरिकांना अतिशय कठोर अशी शिक्षा केली जायला हवी. तसं केलं तरच त्यांना समज येईल”, असे अझरूद्दीनने स्पष्ट केले.
भारतीय जोडीदार निवडणारे परदेशी क्रिकेटपटू…
“सर्व नागरिकांनी सरकारने घालून दिलेले नियम पाळायलाच हवेत. संचारबंदीच्या काळात नागरिकांनी कुठे एकत्र येऊ नये. जोपर्यंत करोनावरील लसीचा शोध लागत नाही, तोपर्यंत आपल्याला सावधानता बाळगली पाहिजे… आणि महत्त्वाचे म्हणजे साऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळायलाच हवे”, असे अझरूद्दीनने नमूद केले.