CoronaVirus Outbreak : करोनाच्या तडाख्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे काही प्रमाणात लोक करोनातून बरे होत आहेत. पण असे असले तरी सध्या देशात करोनाग्रस्तांची संख्या प्रचंड वाढत आहे. राज्यात देखील करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. अशा स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लढाईचा सामना करण्यासाठी आर्थिक मदतीसाठी पीएम केयर निधीत आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे. त्यास उत्तम प्रतिसाद मिळत असून अनेक कलाकार, व्यापारी मंडळी, उद्योगपती, क्रीडापटू, संस्था आणि सर्वसाधारण जनता करोनावर मात करण्यासाठी पुढे सरसावली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Coronavirus : विश्वविजेत्या क्रीडापटूची प्रकृती खालावली; क्रीडा मंत्रालयाने घरी पाठवले डॉक्टर

योग्य ती काळजी आणि उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, यावर साऱ्यांचा विश्वास असून भारतातही याबाबत जनजागृती केली जात आहे. म्हणूनच सर्व स्तरातून मदतीचा ओघ सुरू आहे. पंतप्रधानांच्या आवाहनाला टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, मुंबईकर रोहित शर्मा, सुरेश रैना, धोनी आदी बड्या क्रिकेटपटूंनी मदत केली आहे. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेदेखील त्यात आपला वाटा उचलत ५० लाखांची आर्थिक मदत केली होती. त्यातच आता सचिनने एका संस्थेमार्फत सुमारे ५००० लोकांची जबाबदारीदेखील उचलली आहे.

लॉकडाउनला कंटाळून शारापोवाने थेट फोन नंबरच केला शेअर

मुंबईतील गरीब आणि गरजूंची मदत करणाऱ्या अपनालय नावाच्या संस्थेच्या मदतीने सचिनने हे स्तुत्य पाऊल उचलले आहे. सचिनने गरीब आणि गरजु अशा सुमारे ५००० लोकांच्या एका महिन्याच्या अन्नधान्याची आणि इतर आवश्यक रेशनची जबाबदारी अपनालय संस्थेच्यामार्फत उचलली आहे. नागरिकांना मदत करण्यासाठी अपनालयच्या साथीने सहकार्य केल्याबद्दल अपनालय संस्थेने सचिनचे आभार मानले आहेत.

तर, सचिनने देखील आभार स्वीकार करून तुम्ही तुमचे सत्कार्य सुरू ठेवा आणि गरीब – गरजूंना अशीच मदत करत राहा अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

सचिनने आधी करोनाबाधितांसाठी ५० लाखांची मदतदेखील केली आहे.