पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी देशाविसायांना संबोधित करताना ५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी घरातील सर्व लाइट्स बंद करुन दिवा, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च किंवा बॅटरी लावण्याचं आवाहन केलं आहे. या माध्यमातून आपण करोनामुळे पसरलेला अंध:कार दूर करु, असं मोदींनी म्हटलं आहे. दरम्यान यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी टीका केली असून नरेंद्र मोदी चूल पेटवण्यासंबंधी काहीतरी बोलतील असं वाटलं होतं असं म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवाब मलिक यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “सकाळी ९ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातून देशवासियांच्या हाती घोर निराशा आली आहे. वाटलं होतं चूल पेटवण्यासंबंधी काहीतरी बोलतील. पण त्यांनी तर दिवा पेटवण्याचा उपदेश दिला”.

आणखी वाचा- नरेंद्र मोदींच्या भाषणातील नऊ महत्त्वाचे मुद्दे

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सकाळी नऊ वाजण्याचाय सुमारास देशवासियांशी संवाद साधला. यावेळेस त्यांनी लॉकडाउनच्या काळामध्ये भारतीय दाखवत असलेल्या संयमाचं कौतुक केलं. तसंच एकत्र येऊन करोनाला हरवूयात असं आवाहनही केलं. यावेळी बोलताना त्यांनी भारतीयांना पाच एप्रिल रोजी रात्री ९ वाजता एक गोष्ट करण्याचं आवाहन केलं. यामध्ये त्यांनी देशातील सर्व १३० कोटी भारतीयांनी रात्री नऊ वाजता घरातील सर्व लाइट्स बंद करुन एक दिवा, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च किंवा बॅटरी लावण्याचं आवाहन केलं. या माध्यमातून आपण करोनामुळे पसरलेला अंध:कार दूर करु, असं मोदींनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- जनता कर्फ्यूवेळी केलेली ‘ती’ चूक ५ एप्रिलला करू नका; पंतप्रधान मोदींचं कळकळीचं आवाहन

आणखी वाचा- मोदींचं आवाहन: रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटे लाइट बंद ठेऊन, मेणबत्ती, फ्लॅशलाइट लावा

“करोनाचा सर्वाधिक फटका आपल्या गरीब जनतेला बसला आहे. त्यांना या अंधःकारामधून बाहेर कढण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. त्यासाठीच तुम्हा सर्वांकडून मला या रविवारी म्हणजेच ५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता तुमची नऊ मिनिटं हवी आहेत,” असं मोदींनी आपल्या भाषणात सांगितलं. पुढे बोलताना त्यांनी पाच एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता घरातील सर्व दिवे, लाइट्स बंद करुन घरातील बाल्कनीमध्ये, दारामध्ये एक दिवा लावा किंवा मेणबत्ती, बॅटरी किंवा मोबाईलची फ्लॅश लाइट लावून उभे राहा, असं आवाहन मोदींनी केलं. “करोनामुळे पसरलेल्या अंधःकारामध्ये आपल्याला  सतत सकारात्मकतेकडे आणि प्रकाशाकडे प्रवास करायचा आहे. सर्वाधिक फटका बसलेल्या गरीब जनतेला सकारात्कमतेकडे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आपल्यालाच त्यांना सोबत घेऊन जायचं आहे, ” असं भावनिक आवाहन मोदींनी देशातील जनतेला केलं.