भारतात वाढत चाललेला करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात मोठी घोषणा केली. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आता देशासमोर एकच पर्याय आहे, असं म्हणत आज रात्रीपासून संपूर्ण देश लॉकडाउन जात असल्याचं सांगितलं. २१ दिवसांच्या काळात नागरिकांनी घरात राहण्याबरोबरच काही सल्लेही मोदी यांनी दिले.

करोनाचं वाढत संकट लक्षात घेऊन केंद्र सरकारनं देशात लॉकडाउन करण्याची मागणी राजकीय नेत्यांकडून केली जात होती. यासंदर्भात केंद्रानं अखेर निर्णय घेतला. देशातील जनतेला संबोधित करताना मोदी म्हणाले, ‘करोनाचं संकट परतवून लावण्यासाठी एकच पर्याय आहे. घरात राहणं. तुमची एक चूक तुमच्या घरापर्यंत करोनाला घेऊन शकतो. ज्यावेळी करोनाचा उद्रेक झाला. त्यानंतर सुरूवातीच्या काळात प्रसाराचा वेग खूप कमी होता. पण, त्यानंतर हे प्रचंड वाढलं. मी देशवासियांना आवाहन करतो. त्यांनी घरातच राहून या संकटाला परतवून लावण्यासाठी मदत करावी. ही वेळ धैर्यानं सामोर जाण्याची आहे. भारत अशा टप्प्यावर आहे. ज्यामुळे भारता अनेक आर्थिक संकटांचा मुकाबला करावा लागणार आहे. पण, एक लक्षात ठेवा जान है तो जहाॅन है,’ असं म्हणत मोदी यांनी देशवासियांना धीर दिला.

२१ दिवसांसाठी देशातील सर्व नागरिकांना घरातच राहावं लागणार आहे. सध्याची परिस्थिती बघता तीन आठवड्यांसाठी जिथे असाल तिथे राहा. कारण येणारे २१ दिवस प्रत्येक नागरिकासाठी, प्रत्येक कुटुंबासाठी महत्त्वाचा आहे. कारण २१ दिवसांत ही साखळी तुटली नाही, तर तर देश आणि आपण २० वर्ष मागे जाऊ,’ असं मोदी म्हणाले. या काळात सोशल माध्यमातून अनेक अफवा पसरवल्या जातील. या अफवा प्रचंड वेगानं पसरतात, पण, हीच काळजी घ्यायची की त्यापासून दूर राहायचं आहे,’ असा सल्ला मोदींनी दिला.

Story img Loader