देश सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तावडीत सापडला आहे. मात्र, सध्याची आकडेवारी पाहता देशवासियांना थोडा दिलासा मिळाला आहे. देशात काल दिवसभरात गेल्या ११८ दिवसांमधले सर्वात कमी बाधित आढळले तर उपचाराधीन रुग्णांची संख्याही गेल्या १०९ दिवसांमधली सर्वात कमी आहे.

नवबाधितांची संख्या गेल्या ११८ दिवसातली सर्वात कमी

देशात काल दिवसभरात ३१ हजार ४४३ नव्या बाधितांची नोंद झाली. गेल्या ११८ दिवसातली ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. त्यामुळे आता उपचाराधीन रुग्णांची संख्या ४ लाख ३१ हजार ३१५ वर पोहोचली आहे. गेल्या १०९ दिवसांतली ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे.


तर देशात काल दिवसभरात एकूण ४९ हजार ७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता ३ कोटी ६३ लाख ७२० वर पोहोचली आहे. देशातला रुग्ण बर होण्याचा दर आता ९७.२८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

देशात काल दिवसभरात २०२० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे आत्तापर्यंतच्या मृतांची संख्या आता ४ लाख १० हजार ७८४ वर पोहोचली आहे. तर देशाचा मृत्यूदर १.३३ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

देशातलं लसीकरण

देशात काल दिवसभरात ४० लाख ६५ हजार ८६२ नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. त्यापैकी २५ लाख ५८ हजार ८४५ नागरिकांनी पहिला डोस घेतला तर १५ लाख ७ हजार १७ नागरिकांनी करोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला. त्यामुळे लस घेतलेल्या नागरिकांची संख्या आता ३८ कोटी १४ लाख ६७ हजार ६४६ झाली आहे.

Story img Loader