करोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात भीती व्यक्त केली जात असतानाच सरकारकडून करोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा वेग वाढवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या लसीकरण मोहिमेचा भाग म्हणून मागील काही दिवसांपासून देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये लसीकरण उत्सवाअंतर्गत जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करण्याचा प्रयत्न केला जातोय. मध्य प्रदेशमध्ये नवीन लसीकरण धोरणाच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक लोकांना लस देण्याचा विक्रम करण्यात आला. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी १७ लाखांहून अधिक जणांना एकाच दिवशी लस देण्यात आल्याचा दावा केलाय. मात्र आता मध्य प्रदेश सरकारकडून करण्यात येणाऱ्या या दाव्यासंदर्भात शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे. मध्य प्रदेश सरकारने एका १३ वर्षाच्या मुलाला लस दिल्याचा ऑन पेपर दावा केलाय. विशेष म्हणजे या मुलाचं लसीकरण केल्याचा मेसेज पाठवण्यात आला असून वय ५६ असल्याचं सांगण्यात आलंय.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा