देशात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती काही प्रमाणात निवळत आहे. तर दुसरीकडे मुंबई, महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील स्थिती चिंताजनक आहे. लॉकडाउनमुळे करोनाच्या प्रसारावर परिणाम झाला आहे. पण, दररोज वाढत चाललेल्या रुग्णांमुळे आरोग्य विभागालासमोर आव्हान उभं राहत आहे. त्यामुळे लॉकडाउन लांबत जाणार असं चित्र सध्या मुंबई आणि महाराष्ट्रात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Live Blog
Live Blog
Highlights
मिरा भाईंदर शहरात रविवारी १४ नवे रुग्ण आढळून आले. यामुळे एकूण रुग्ण संख्या आता २५६ एवढी झाली आहे. विशेष म्हणजे आज १६ रुग्णांना करोनामुक्त करण्यात प्रशासनाला यश आले आहे. रविवारी नोंद झालेल्या रुग्णांमध्ये मिरा रोडमध्ये ६, भाईंदर पूर्वेला ५ आणि पश्चिमेला ३ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत १४३ रुग्णांना करोनामुक्त करण्यात आल्यामुळे १०६ करोनाबाधित रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. आज समोर आलेल्या अहवालात दोन वर्षीय मुलाचा देखील समावेश आहे. या मुलावर भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पालघर जिल्ह्यातील विविध ठिकाणी टाळेबंदीत अडकलेल्या सुमारे १,२०० नागरिकाना घेऊन पालघरहून मध्यप्रदेश येथे जाणारी पहिली श्रमिक विशेष ट्रेन जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत रवाना झाली. ट्रेन रवाना होत असताना प्रवाशांनी दिलेल्या 'भारत माता की जय', 'वंदे मातरम' या घोषणांनी पालघर रेल्वे स्थानक दुमदुमून गेले. सविस्तर वृत्त वाचा
पुणे शहरात करोना विषाणूचे रुग्ण मोठया प्रमाणावर आढळत असून आज दिवसभरात १०२ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर दुसरीकडे मागील ४५ दिवसात प्रथमच १४ दिवसाच्या क्वारंटाइननंतर तब्बल १९४ रुग्ण करोनामुक्त झाले, या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे दिवसभरात ही एक दिलासादायक बाब ठरली आहे. सविस्तर वृत्त वाचा
पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात दोन करोनाबाधित रुग्ण आढळले. तर पुण्यात खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या भोसरी येथील एकाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील करोनाबाधितांचा एकूण आकडा १६९ पोहोचला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे करोनामुक्त रुग्णांची संख्या १०७ वर पोहचली. पिंपरी-चिंचवड शहरात आत्तापर्यंत करोनामुळे ४ जणांचा मृत्यू झाला आहे.
रायगड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात करोनाचे ३६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या २५० वर पोहोचली. धक्कादायक बाब म्हणजे उरण एकाच कुटूंबातील २१ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर पनवेल मनपा हद्दीत १३, पनवेल ग्रामिण हद्दीत एक तर महाडमध्ये एक नवा रुग्ण आढळून आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे २४ तास २३ रुग्ण करोनामुक्त झाले.
नवी मुंबईतील करोनाबाधित रुग्णांची रविवारी आतापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली. एकाच दिवसात तब्बल ८२ रुग्ण आढळून आले. त्यामुळे शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या ६७४ वर पोहोचली. दरम्यान, आज २ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील मृतांची संख्या १४ वर पोहोचली आहे.
वसई-विरार शहरात रविवारी ६ नवीन रुग्ण आढळून आले तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. यामुळे एकूण रुग्ण संख्या आता २०८ एवढी झाली आहे. रविवारी नोंद झालेल्या रुग्णांमध्ये नालासोपाऱ्यात तीन तर वसई, नायगाव आणि विरार मधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे शहरातील एकूण रुग्ण संख्या २०८ एवढी झाली आहे. विरारमधील ६० वर्षीय रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याने शहरातील एकूण बळी ११ ऐवढे झाले आहेत.
करोनाचं हॉटस्पॉट बनलेल्या बेळगाव जिल्ह्यात रविवारी एकाच दिवशी ३० रुग्ण आढळले. यापूर्वी बेळगाव जिल्ह्यात अनेक करोना रुग्णांचा इतिहास हा तबलीगींशी जुळला होता. पण आज आढळलेले रुग्ण हे राजस्थानमधील अजमेर येथील आहेत. यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील २२ जणांचा समावेश असून बागलकोट, बदामी जिल्ह्यातील आठ जणांचा समावेश आहे. सविस्तर वृत्त वाचा
करोनानं मृत पावलेली महिला अनेक व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे स्पष्ट झाल्याने या सर्व लोकांची माहिती घेण्यासाठी प्रशासनाने १५ चमू गठीत केला आहे. संसर्गाचे कारण मृत महिलेची नातलग असलेली परिचारिका असल्याबाबत तपास सुरू आहे. सविस्तर वृत्त वाचा
करोनाचा फैलाव सोलापुरात झपाट्याने वाढत असून रविवारी एकाच दिवशी उच्चांकी ४८ करोनाबाधित रूग्ण सापडले. यात नऊ पोलिसांचाही समावेश आहे. याशिवाय काही आरोग्य कर्मचाऱ्यांनाही करोनाची बाधा झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील करोनाबाधित रूग्णांची संख्या २६४ वर पोहोचली असून यात १४ मृतांचा समावेश आहे. सविस्तर वृत्त वाचा
मुंबईत करोनाचा विळखा वाढतच चालला असल्याचे रोजच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. त्यातच कारागृहातील कैद्यांबाबतही आता चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण, आर्थर रोड येथील मुंबई मध्यवर्ती कारागृहातील आणखी ८१ कैद्यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे एकूण करोनाबाधित कैद्यांची संख्या १५८ वर पोहोचली आहे. सविस्तर वृत्त वाचा
अर्थमंत्री निर्मला सीतारामन सोमवारी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत एक आढावा बैठक घेणार आहेत. यामध्ये कर्जची स्थिती आणि याव्यतिरिक्त अन्य मुद्द्यांवरही चर्चा करण्यात येणार आहे. ही बैठक करोना व्हायरसच्या संकटातून अर्थव्यवस्थेला उभारी देण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांचा भाग असल्याचं म्हटलं जात आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक पार पडणार आहे. यामध्ये कर्ज घेतलेल्या ग्राहकांपर्यंत व्याज दरातील कपातीचा फायदा पोहोचवण्यापासून कर्ज फेडण्याच्या कालावधीत सुट देण्याच्या बँकांच्या योजनांचा आढावा घेतला जाणार आहे.
मुंबईत रोजगारानिमित्त वास्तव्यास असलेल्या पश्चिम बंगालमधील मजूरांना करोना संकटामुळं आणि लॉकडाउनमुळं सध्या कामधंदाही बंद असल्याने गावाकडं जाण्याची ओढ लागली आहे. यासाठी त्यांना वाहनांनी प्रवास करण्याची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे ते आता पायीच निघाले आहेत. या मजुरांसाठी पश्चिम बंगाल सरकारनं विशेष रेल्वेला परवानगी द्यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सविस्तर वृत्त वाचा
ऑर्थर रोड कारागृहाबरोबर पाठोपाठ भायखळातील महिला कारागृहातही करोनानं शिरकाव केला आहे. कारागृहातील ५४ वर्षीय महिला कैद्याला करोनााचा संसर्ग झाला आहे. ८ मे रोजी या महिलेची पहिली करोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यानंतर ९ मे रोजी दुसरी चाचणी करण्यात आली. त्याचा रिपोर्ट आला असता, त्यात करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं आहे. महिलेला सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भायखळा तुरुंग प्रशासनानं ही माहिती दिली.
A 54 year-old inmate of Byculla women jail has tested positive for COVID19. Her first test result on 8th May was negative but the second test conducted on 9th May has come positive. She is under treatment at St George's Hospital: Byculla Jail authorities
— ANI (@ANI) May 10, 2020
मेट्रो ३ च्या माजी व्यवस्थापकिय संचालक अश्विनी भिडे यांना मुंबई महापालिकेचं अतिरिक्त आयुक्तपद देण्यात आलं आहे. जयश्री बोस यांच्या जागी अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार अश्विनी भिडे आणि संजीव जयस्वाल यांनी शनिवारी स्वीकारला. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे आणि मुंबईकरांच्या सेवेसाठी संधी दिल्याबद्दल त्यांनी पालिकेचेही आभार मानले आहेत. तसंच करोनाच्या लढ्यासाठी आम्ही सज्ज असल्याचंही त्या म्हणाल्या.
Thank you so much @mybmc. Another opportunity to serve Mumbaikars. Look forward to fight the COVID war with determination and dedication with team @mybmc. I will try to give my best. https://t.co/Hm4dCzffso
— Ashwini Bhide (@AshwiniBhide) May 9, 2020
मेट्रो ३ च्या माजी व्यवस्थापकिय संचालक अश्विनी भिडे यांना मुंबई महापालिकेचं अतिरिक्त आयुक्तपद देण्यात आलं आहे. जयश्री बोस यांच्या जागी अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार अश्विनी भिडे आणि संजीव जयस्वाल यांनी शनिवारी स्वीकारला. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे आणि मुंबईकरांच्या सेवेसाठी संधी दिल्याबद्दल त्यांनी पालिकेचेही आभार मानले आहेत. तसंच करोनाच्या लढ्यासाठी आम्ही सज्ज असल्याचंही त्या म्हणाल्या.
वर्धेतील सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रूग्णालयात एक करोनाबाधीत रूग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सदर रूग्ण उपचारासाठी वाशिम जिल्ह्यातून शनिवारी दाखल झाला होता. त्याची तपासणी झाल्यानंतर तो करोनाग्रस्त असल्याचे रात्री स्पष्ट झाले.
वसई स्टेशनवरून उत्तर प्रदेशासाठी आज दुपारी २ वाजता विशेष ट्रेन सुटणार आहे. ही ट्रेन वसई ते जौंनपुर स्थानकादरम्यान दरम्यान धावणार आहे. सध्या लॉकडाउनमध्येही स्थलांतरितांना आपल्या गावी जाता यावे यासाठी सरकारकडून विशेष रेल्वे सोडल्या जात आहेत. याद्वारे महाराष्ट्रातील शेकडो परप्रांतीय मजूर आपल्या गावी परतत आहेत.
जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढत आहे. मागील चोवीस तासांत देशभरात 3 हजार 277 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर 127 जणांचा करोनाने बळी घेतला आहे. देशभरातील करोनाबाधितांची रुग्ण संख्या आता 62 हजार 939 वर पोहचली आहे. ज्यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले 41 हजार 472 रुग्ण, उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेले 19 हजार 358 जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या 2 हजार 109 जणांचा समावेश आहे.
Spike of 3277 #COVID19 cases & 127 deaths in the last 24 hours. Total cases in the country now at 62939, including 41472 active cases, 19358 cured/discharged/migrated and 2109 deaths: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/XoGLfUF3Jr
— ANI (@ANI) May 10, 2020
करोनातून बरे झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे अधिक शिथिल करण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी घेतला. त्यानुसार, अतिसौम्य-सौम्य व मध्यम तीव्रतेच्या रुग्णांमध्ये सलग तीन दिवस ताप नसेल तर नमुना चाचणी न करताही त्यांना घरी पाठवता येईल. फक्त गंभीर रुग्णांना सोडण्यापूर्वी नमुना चाचणी तसेच अन्य वैद्यकीय चाचणी करावी लागणार आहे.
जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरासह राज्यात दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, पुणे या दोन प्रमुख शहरांच्या पाठोपाठ आता मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात देखील करोनाबाधितांचा आकडा कमालीचा वाढला आहे. आज औरंगाबादेत आणखी 38 नवे पॉझिटव्ह रुग्ण आढळले असून शहारातील कोरनाबाधितांची संख्या आता 546 वर पोहचली आहे.
समूह संसर्ग सुरू झाला आहे का, याची खात्री करून घेण्यासाठी देशभरातील ७५ जिल्ह्य़ांमध्ये भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेकडून (आयसीएमआर) आढावा घेतला जाणार आहे. यापूर्वी मार्च महिन्यामध्ये आढावा घेण्यात आला होता. समूह संसर्ग झाला नसल्याची अधिकृत भूमिका केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कायम ठेवली आहे.
देशातील आठ शहरांमध्ये करोनाचे ६० टक्के रुग्ण असून त्यापैकी मुंबई, अहमदाबाद आणि दिल्ली या तीन शहरांमध्ये ४२ टक्के रुग्ण आढळले आहेत. अन्य पाच शहरांमध्ये पुणे, ठाणे, मध्य प्रदेशमधील इंदूर, तमिळनाडू आणि राजस्थानची राजधानी अनुक्रमे चेन्नई व जयपूर यांचा समावेश आहे.
धारावीत आणखी २५ रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या ८३३ वर गेली आहे. २७ जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत २२२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. माहिममध्ये पाच रुग्ण आढळले असून रुग्णांचा आकडा ११२ वर गेला आहे. दादरमध्ये १८ नवीन रुग्ण सापडले असून त्यातील ८ रुग्ण हे कासारवाडी येथील आहेत. त्यामुळे दादरमधील रुग्णांचा आकडा १०५ झाला आहे. शनिवारी २०३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत २७९२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. वरळीच्या एनएससीआय येथील करोना काळजी केंद्रातून शनिवारी १३७ रुग्णांना घरी पाठवण्यात आले. यात वरळी, प्रभादेवीतील ९५ रुग्ण असून अन्य रुग्ण हे मुंबईच्या विविध भागांतील आहेत. कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये ८४ वर्षीय महिलेपासून ते दहा वर्षीय बालकांपर्यंतच्या रुग्णांचा समावेश आहे.
आर्थर रोड कारागृहातील करोनाबाधित कैद्यांना माहूलमध्ये ठेवण्यास स्थानिक रहिवाशांनी विरोध दर्शविला आहे. आर्थर रोड कारागृहातील ७२ कैद्यांना माहूल येथील इमारतींमध्ये विलगीकरणात ठेवण्यावर विचार सुरू आहे. मात्र स्थानिकांचा त्याला विरोध आहे. प्रदूषित माहूलमध्ये या कैद्यांना आणल्यास स्थानिकांमध्ये करोनाचा प्रसार होण्याची भीती रहिवासी व्यक्त करत आहेत.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून दररोज ७०० च्या वर रुग्ण सापडत आहेत, तर संशयित रुग्णांची संख्याही वाढत आहे. शनिवारी ७२२ रुग्ण वाढल्यामुळे बाधितांची संख्या १२,६८९ वर गेली आहे, तर आणखी ६५२ संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. शनिवारी २७ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात १६ महिला तर ११ पुरुष आहेत, तर १५ रुग्ण ६० वर्षांखालील आहेत. मुंबईतील मृतांचा आकडा वाढला असून, ४८९ इतका झाला आहे.
Highlights
मिरा भाईंदर शहरात रविवारी १४ नवे रुग्ण आढळून आले. यामुळे एकूण रुग्ण संख्या आता २५६ एवढी झाली आहे. विशेष म्हणजे आज १६ रुग्णांना करोनामुक्त करण्यात प्रशासनाला यश आले आहे. रविवारी नोंद झालेल्या रुग्णांमध्ये मिरा रोडमध्ये ६, भाईंदर पूर्वेला ५ आणि पश्चिमेला ३ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत १४३ रुग्णांना करोनामुक्त करण्यात आल्यामुळे १०६ करोनाबाधित रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. आज समोर आलेल्या अहवालात दोन वर्षीय मुलाचा देखील समावेश आहे. या मुलावर भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पालघर जिल्ह्यातील विविध ठिकाणी टाळेबंदीत अडकलेल्या सुमारे १,२०० नागरिकाना घेऊन पालघरहून मध्यप्रदेश येथे जाणारी पहिली श्रमिक विशेष ट्रेन जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत रवाना झाली. ट्रेन रवाना होत असताना प्रवाशांनी दिलेल्या 'भारत माता की जय', 'वंदे मातरम' या घोषणांनी पालघर रेल्वे स्थानक दुमदुमून गेले. सविस्तर वृत्त वाचा
पुणे शहरात करोना विषाणूचे रुग्ण मोठया प्रमाणावर आढळत असून आज दिवसभरात १०२ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर दुसरीकडे मागील ४५ दिवसात प्रथमच १४ दिवसाच्या क्वारंटाइननंतर तब्बल १९४ रुग्ण करोनामुक्त झाले, या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे दिवसभरात ही एक दिलासादायक बाब ठरली आहे. सविस्तर वृत्त वाचा
पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात दोन करोनाबाधित रुग्ण आढळले. तर पुण्यात खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या भोसरी येथील एकाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील करोनाबाधितांचा एकूण आकडा १६९ पोहोचला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे करोनामुक्त रुग्णांची संख्या १०७ वर पोहचली. पिंपरी-चिंचवड शहरात आत्तापर्यंत करोनामुळे ४ जणांचा मृत्यू झाला आहे.
रायगड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात करोनाचे ३६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या २५० वर पोहोचली. धक्कादायक बाब म्हणजे उरण एकाच कुटूंबातील २१ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर पनवेल मनपा हद्दीत १३, पनवेल ग्रामिण हद्दीत एक तर महाडमध्ये एक नवा रुग्ण आढळून आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे २४ तास २३ रुग्ण करोनामुक्त झाले.
नवी मुंबईतील करोनाबाधित रुग्णांची रविवारी आतापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली. एकाच दिवसात तब्बल ८२ रुग्ण आढळून आले. त्यामुळे शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या ६७४ वर पोहोचली. दरम्यान, आज २ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील मृतांची संख्या १४ वर पोहोचली आहे.
वसई-विरार शहरात रविवारी ६ नवीन रुग्ण आढळून आले तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. यामुळे एकूण रुग्ण संख्या आता २०८ एवढी झाली आहे. रविवारी नोंद झालेल्या रुग्णांमध्ये नालासोपाऱ्यात तीन तर वसई, नायगाव आणि विरार मधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे शहरातील एकूण रुग्ण संख्या २०८ एवढी झाली आहे. विरारमधील ६० वर्षीय रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याने शहरातील एकूण बळी ११ ऐवढे झाले आहेत.
करोनाचं हॉटस्पॉट बनलेल्या बेळगाव जिल्ह्यात रविवारी एकाच दिवशी ३० रुग्ण आढळले. यापूर्वी बेळगाव जिल्ह्यात अनेक करोना रुग्णांचा इतिहास हा तबलीगींशी जुळला होता. पण आज आढळलेले रुग्ण हे राजस्थानमधील अजमेर येथील आहेत. यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील २२ जणांचा समावेश असून बागलकोट, बदामी जिल्ह्यातील आठ जणांचा समावेश आहे. सविस्तर वृत्त वाचा
करोनानं मृत पावलेली महिला अनेक व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे स्पष्ट झाल्याने या सर्व लोकांची माहिती घेण्यासाठी प्रशासनाने १५ चमू गठीत केला आहे. संसर्गाचे कारण मृत महिलेची नातलग असलेली परिचारिका असल्याबाबत तपास सुरू आहे. सविस्तर वृत्त वाचा
करोनाचा फैलाव सोलापुरात झपाट्याने वाढत असून रविवारी एकाच दिवशी उच्चांकी ४८ करोनाबाधित रूग्ण सापडले. यात नऊ पोलिसांचाही समावेश आहे. याशिवाय काही आरोग्य कर्मचाऱ्यांनाही करोनाची बाधा झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील करोनाबाधित रूग्णांची संख्या २६४ वर पोहोचली असून यात १४ मृतांचा समावेश आहे. सविस्तर वृत्त वाचा
मुंबईत करोनाचा विळखा वाढतच चालला असल्याचे रोजच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. त्यातच कारागृहातील कैद्यांबाबतही आता चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण, आर्थर रोड येथील मुंबई मध्यवर्ती कारागृहातील आणखी ८१ कैद्यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे एकूण करोनाबाधित कैद्यांची संख्या १५८ वर पोहोचली आहे. सविस्तर वृत्त वाचा
अर्थमंत्री निर्मला सीतारामन सोमवारी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत एक आढावा बैठक घेणार आहेत. यामध्ये कर्जची स्थिती आणि याव्यतिरिक्त अन्य मुद्द्यांवरही चर्चा करण्यात येणार आहे. ही बैठक करोना व्हायरसच्या संकटातून अर्थव्यवस्थेला उभारी देण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांचा भाग असल्याचं म्हटलं जात आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक पार पडणार आहे. यामध्ये कर्ज घेतलेल्या ग्राहकांपर्यंत व्याज दरातील कपातीचा फायदा पोहोचवण्यापासून कर्ज फेडण्याच्या कालावधीत सुट देण्याच्या बँकांच्या योजनांचा आढावा घेतला जाणार आहे.
मुंबईत रोजगारानिमित्त वास्तव्यास असलेल्या पश्चिम बंगालमधील मजूरांना करोना संकटामुळं आणि लॉकडाउनमुळं सध्या कामधंदाही बंद असल्याने गावाकडं जाण्याची ओढ लागली आहे. यासाठी त्यांना वाहनांनी प्रवास करण्याची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे ते आता पायीच निघाले आहेत. या मजुरांसाठी पश्चिम बंगाल सरकारनं विशेष रेल्वेला परवानगी द्यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सविस्तर वृत्त वाचा
ऑर्थर रोड कारागृहाबरोबर पाठोपाठ भायखळातील महिला कारागृहातही करोनानं शिरकाव केला आहे. कारागृहातील ५४ वर्षीय महिला कैद्याला करोनााचा संसर्ग झाला आहे. ८ मे रोजी या महिलेची पहिली करोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यानंतर ९ मे रोजी दुसरी चाचणी करण्यात आली. त्याचा रिपोर्ट आला असता, त्यात करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं आहे. महिलेला सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भायखळा तुरुंग प्रशासनानं ही माहिती दिली.
राज्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. सर्वसामान्यांबरोबरच आता पोलीस कर्मचाऱ्यांमध्येही करोनाचा संसर्ग आढळत आहे. आज पुण्यात तीन पोलिसांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.