घटनात्मक यंत्रणांनी भ्रष्टाचारासंबंधी व्यापक बोलबाला केलेला असला तरी, यूपीएच्या राजवटीत भ्रष्टाचारासंबंधी वाटते तितकी परिस्थिती वाईट नाही, असा दावा केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांनी गुरुवारी येथे केला. भ्रष्टाचार आहे, हे मान्य..परंतु ही परिस्थिती आत्यंतिक वाईट नाही, असे त्यांनी ‘बीबीसी’ वृत्तवाहिनीस मुलाखत देताना सांगितले.
भ्रष्टाचाराबद्दल विचारणा केली असता ९२ टक्के लोकांनी ही परिस्थती अत्यंत वाईट असल्याचे नमूद केले होते. त्याकडे लक्ष वेधले असता चिदंबरम् यांनी उपरोक्त स्पष्टीकरण दिले. भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ास मोठे स्वरूप देण्यात आले आहे. भ्रष्टाचारावर चर्चा होऊ शकते. भ्रष्टाचार सर्वदूर पसरला असल्याचे काही घटनात्मक यंत्रणांनी म्हटले आहे, असे चिदंबरम् म्हणाले.
या समस्येबद्दल सरकार सतर्क असून तिचे निराकरण करण्यासाठी प्रयत्नशीलही असल्याचा त्यांनी दावा केला. भ्रष्टाचाराची समस्या केवळ भारतापुरतीच मर्यादित नसून अन्य देशांनाही या समस्येने ग्रासले आहे, असे त्यांनी सांगितले. आपल्या लोकप्रतिनिधींवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, असे विचारले असता जगभरातील मान्यवर मासिकांमध्ये इतरांच्या भ्रष्टाचाराचे वृत्तान्त येत असतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या यशाबद्दल बोलताना उपाध्यक्ष राहुल गांधी यांना निवडणुकीचे प्रचारप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले असून त्यांच्या नेतृत्वाखाली येत्या निवडणुका जिंकल्या जातील. मात्र तसे झाले नाही तरी पुढील निवडणुकीत ते विजय मिळवून देऊ शकणार नाहीत असे तुम्हास वाटते काय, अशी विचारणा चिदंबरम् यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा