अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर खरेदी करताना वेगवेगळ्या ठिकाणी नियमांचा भंग करण्यात आल्याबद्दल कॅगच्या अहवालात संरक्षण मंत्रालय आणि हवाई दलावर कडक शब्दांत ताशेरे ओढण्यात आले आहेत. 
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा ३,७२७ कोटी रुपयांचा ऑगस्टावेस्टलॅंडबरोबर केलेला व्यवहार याअगोदर लाचखोरीमुळे वादग्रस्त ठरला आहे. त्यात आता कॅगनेही या व्यवहारात नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवलाय. कॅगचा अहवाल संसदेमध्ये सादर करण्यात आला आहे. व्यवहारापूर्वी आलेल्या दोन कंपन्याच्या हेलिकॉप्टर्सची परदेशात जाऊन चाचणी घेण्याचा तत्कालिन हवाईदल प्रमुखांच्या निर्णयावरही कॅगने प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
ऑगस्टावेस्टलॅंडने या हेलिकॉप्टर्ससाठी ३९६६ कोटी रुपये इतक्याच किंमती निविदा भरली होती. त्यापार्श्वभूमीवर बारा हेलिकॉप्टर्स खरेदी करण्यासाठी आधार किंमत विनाकारण जास्त ठेवण्यात आली होती, असा आक्षेप कॅगने नोंदवला. संरक्षण साहित्य खरेदीसाठी २००६ तयार करण्यात आलेल्या नियमावलीतील अनेक नियमांचे उल्लंघन हे हेलिकॉप्टर खरेदी करताना झाले आहे. हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी सप्टेंबर २००६मध्येच निविदा मागविण्यात आल्या होत्या, याकडेही लक्ष वेधण्यात आले.

Story img Loader