शिक्षणासाठी भारतातून युक्रेनमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांना भारतात सुखरुप परत आणा असे पंतप्रधानांना ट्वीट करुन सांगितले होते पण त्यांना उत्तर प्रदेश आणि इतर निवडणुकांपेक्षा या देशात काहीच महत्वाचे वाटत नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला आहे. युक्रेनमध्ये युध्द सुरू झाले असून भारतातील विद्यार्थी अडकले असल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना जयंत पाटील यांनी केलेल्या ट्वीटची आठवण करून दिली.

ज्यावेळी निवडणूका देशात सुरू होतात त्यावेळी केंद्र सरकारमध्ये काम करणाऱ्या लोकांना कशातच रस नसतो असा अनुभव आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला. “युक्रेन मध्ये आपले विद्यार्थी अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर परत आणा असे आठ दिवसापूर्वी केंद्र सरकारच्या प्रमुखांचे लक्ष ट्वीटच्या माध्यमातून वेधले होते परंतु कोणतीच कार्यवाही झाली नाही,” असेही जयंत पाटील म्हणाले.

maharashtra assembly polls 2024 state economy in decline during bjp rule says chidambaram
भाजपच्या सत्ताकाळात महाराष्ट्राची पीछेहाट; माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची टीका
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Solapur, Uddhav Thackeray group leader, benami assets,
सोलापूर : उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याकडे ११.१२ कोटींची बेनामी मालमत्ता, बार्शीत गुन्हा दाखल
dcm devendra fadnavis criticized congress mla ravindra dhangekar
‘कसब्या’तील आमदारांची कामे कमी आणि दंगा जास्त; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका
Panvel issue of commuters loot of passengers Panvel,
पनवेल : प्रवाशांच्या समस्यांचा मुद्दा प्रचारातून गायब, रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट, असुरक्षित प्रवासाबाबत सर्वपक्षीय नेते गप्पच
yogi adityanath criticize congress and mahavikas aghadi
योगी आदित्यनाथ म्हणाले “काँग्रेस नेतृत्वातील ‘मविआ’ची नियत साफ नाही”
Rights and Duties of the Opposition in democracy
चतु:सूत्र : लोकशाहीत विरोधी पक्षाची गरज
Sanjay Raut and Mallikarjun Kharge
खरगेंच्या मुखी समर्थ रामदासांचा श्लोक, पण संजय राऊत निरुत्तर; जाहीरनामा प्रसिद्ध करताना नेमकं काय घडलं?

“युक्रेन मध्ये कालपासून युध्द सुरू झाले आहे. या संकटात विद्यार्थी सापडले आहेत. मी ट्वीट करुन मागणी केली त्याचवेळी प्रयत्न केला असता तर आज विद्यार्थी सुरक्षित राहिले असते. आज ते असुरक्षित आहेत. याची नोंद अगोदरच घ्यायला हवी होती पण केंद्र सरकारने घेतली नाही. आतातरी नोंद घेतील,” असे जयंत पाटील म्हणाले.

युक्रेनमध्ये मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. युक्रेनमध्ये सुमारे २०,००० भारतीय राहतात. रशियाने युक्रेनवर आक्रमण करण्यापूर्वी त्यापैकी काहींनी आधीच युक्रेन सोडले होते. मात्र हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे अनेक लोक अजूनही अडकून पडले आहेत. हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे एअर इंडियाच्या विमानाला परतावे लागले. त्यामुळे अशा परिस्थितीत सरकार विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्याची योजना आखत आहे.