देशाची आर्थिक वाटचाल योग्य दिशेने होत असून कोणतीही चिंता करण्याची गरज नसल्याचे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे. इतर देशामंध्ये भारताच्या विकासाची गती मंदावल्याच्या प्रतिक्रिया उमटत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी हे वक्तव्य केले आहे.
येत्या निवडणुकांनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल आणि पुन्हा एकदा भारत विकासाच्या दृष्टीने आव्हान पेलण्यास सज्ज असेल असा विश्वासही यावेळी पंतप्रधानांनी व्यक्त केला.   
नवी दिल्ली येथील १२व्या प्रवासी भारतीय दिनाच्या उद्‌घाटनावेळी केलेल्या भाषणामध्ये पंतप्रधान म्हणाले की, “मला माहिती आहे अनेकांच्या मनात भारताच्या आर्थिक भविष्याबाबत अनेक प्रश्न असतील परंतु, चिंता करण्याची गरज नाही. भारताचे भवितव्य उज्ज्वल आहे. प्रत्येकाने त्याबाबत आत्मविश्वास बाळगा. भारताबाहेरील भारतीय वंशाचे नागरिक (डायस्पोरा) हा भारताच्या परराष्ट्र धोरणामधील एक महत्त्वपूर्ण घटक मानला जातो. गेल्या नऊ वर्षांचा आढावा घेतल्यास भारताच्या विकासाचा स्तर समतोल राखण्यात आपण यशस्वी झालो आहोत. सकारात्मक भूमिकाच विकासाचे दार उघडतात त्यामुळे निराश होऊन देशाच्या भविष्याबाबत नकारात्मक विचार करणे सोडून द्या” असेही पंतप्रधान म्हणाले. तसेच भारताच्या भविष्यकाळातील प्रवासामध्ये आत्मविश्‍वास व आशावाद घेऊन सहभागी होण्याचे आवाहन यावेळी पंतप्रधानांनी अनिवासी भारतीयांना केले  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा