देशाचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी मानवाधिकारांचे हनन, वाढती असहिष्णूता तसेच देशातील जास्तीत जास्त पैसा श्रीमंतांच्याच खिशात जात असल्याने गरीब-श्रीमंतांची वाढलेली दरी यावरुन चिंता व्यक्त केली आहे. प्रणब मुखर्जी फाऊंडेशनद्वारे आयोजित एका संमेलनात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुखर्जी म्हणाले, देश सध्या एका अवघड परिस्थितीतून जात आहे. ज्या भूमीने वसुधैव कुटुंबकम आणि सहिष्णूतेचे धडे जगाला दिले आहेत. त्याच भूमी आता असहिष्णुतेत वाढ, मानवाधिकारांचे उल्लंघन आणि दंगलींमुळे चर्चेत आहे. सध्या सरकारी संस्थांवरचा जनतेचा विश्वास उडाला आहे. या संस्थांच्या कामकाजाबाबत संशयाचे वातावरण आहे.

जेव्हा एखादे राष्ट्र बंधुभाव आणि सहिष्णुतेचे स्वागत करते तेव्हा ते विविध समाजाच्या सद्भावनेला प्रोत्साहित करतो. आपण परस्परांबद्दलच्या द्वेषाला दूर करतो आणि आपल्या रोजच्या जीवनातील ईर्ष्या आणि आक्रमकता दूर करतो तेव्हा तिथे शांती आणि बंधुभाव निर्माण होतो. सर्वाधिक चांगले वातावरण अशा देशांमध्ये असते जो देश आपल्या नागरिकांना मुलभूत सोयी-सुविधा पुरवतो. त्यांना सुरक्षा आणि स्वायत्तता प्रदान करतो.