अल काईदासारख्या अतिरेकी संघटनांकडून धोका असला तरी आम्ही त्याचा खंबीरपणे मुकाबला करू असे भारतीय हवाई दलाचे प्रमुख अरूप राहा यांनी सांगितले.
अल काईदा भारतात कारवाया वाढवणार असल्याच्या संदर्भात विचारले असता त्यांनी सांगितले की, जरी अल काईदाचा धोका असला तरी आमचा देश त्याला तोंड देण्यास सज्ज आहे १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील हवाई दलाच्या कामगिरीवर आधारित चर्चासत्राच्या प्रसंगी ते वार्ताहरांशी बोलत होते.
व्हिडिओ: भारतात संघटना वाढविण्याचा अल-कायदाचा फुत्कार
अमेरिकी माध्यमे व गुप्तचरांनी असे म्हटले होते की, अल काईदाने भारतात जिहादची लढाई चालू करण्याचे ठरवले आहे व भारतीय उपखंडात शरिया तसेच खिलाफतची अंमलबजावणी करण्याचे ठरवले आहे.
अल काईदाच्या सहाब या माध्यम संघटनेने असे जाहीर केले आहे की, भारतीय उपखंडात कैदत अल जिहाद ही संस्था स्थापन केल्याचे सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या  व्हिडिओनुसार अल काईदा अफगाणिस्तान व पाकिस्तानात सक्रिय आहे, पण अयमान अल जवाहिरी याने कैदत अल जिहाद ही संघटना आता भारत, म्यानमार व बांगलादेश या देशात कार्यरत होईल.सुरक्षा संस्थांना असे वाटते की, भारतीय उपखंडात या अतिरेकी संघटनेला भरती करायची असावी कारण त्यांचा प्रभाव इसिसच्या तुलनेत कमी होत चालला आहे.

Story img Loader