“मुक्त संबंधांच्या लालसेतून अनेक तरुण-तरुणी त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत”, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी अलाहाबाद कोर्टने केली आहे. “पाश्चिमात्य संस्कृतीचं हे अनुकरण असून, यामुळे आयुष्यभराचा जीवनसाथी मिळत नाही”, याबाबतही न्यायालायने चिंता व्यक्त केली आहे. एका मुलीच्या आत्महत्येप्रकरणी सुनावणी करताना न्यायायलायने ही टिप्पणी केली आहे.

“पाश्चिमात्य संस्कृतीचे आंधळेपणे अनुकरण करणारे देशातील तरुण मुक्त संबंध ठेवण्यास प्राधान्य देतात. या लालसेपोटी तरुणाई आपले आयुष्य वाया घालवत आहे. यामुळे त्यांना योग्य जीवनसाथी मिळत नाही. सोशल मीडिया, चित्रपट आणि टीव्ही मालिकांतून असे नातेसंबंध दाखवले जातात. त्याचा प्रभाव तरुणांवर पडतो. यामुळे तरुणांना त्यांच्या जीवनाचा योग्य मार्ग ठरवता येत नाही”, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा >> जामीन काळात पोलिसांना गुगल लोकेशन द्यावं लागणार; उच्च न्यायालयाच्या आदेशावर सुप्रीम कोर्टाचा आक्षेप, म्हणाले…!

“चित्रपट, मालिकांमधून जोडीदार फसवणूक करत असल्याचे दाखवतात. त्यामुळे तरुणाईही नात्यांमध्ये असाच अविश्वास दाखवते. त्यामुळे कायमस्वरुपी नात्यात अडकण्यापेक्षा तरुणाई मुक्त संबंध ठेवण्यास प्राधान्य देत आहे”, याकडे न्यायालयाने लक्ष वेधलं. लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचे प्रकरण, मित्रांच्या साथीने जोडीदाराची हत्या, अशी प्रकरणे न्यायालयात सर्वाधिक असल्याचंही न्यायाधीशांनी सांगितलं.

चित्रपटातून प्रभाव पण समाजाने नाकारलं

“पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण होत असल्याने परिणामांची जाणीव नसलेली तरुण पिढी सोशल मीडिया, चित्रपटांमुळे प्रभावित होते. या माध्यमातून दाखवलेले नातेसंबंध ही तरुणाई स्वीकारते. परंतु, त्यांच्या नात्याला समाजाने विरोध केल्यानंतर तरुणाई नैराश्येत जाते”, असंही न्यायालयाने म्हटलं आहे. “समाजाविरोधात, पालकांविरोधात जाऊन तरुणाई नातेसंबंध निर्माण करते. परंतु, या नात्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना मार्ग सापडत नाही”, असंही न्यायालयाने पुढे म्हटलं.

हेही वाचा >> लोकसभेतील ४४ टक्के आणि राज्यसभेतील ३१ टक्के खासदारांवर गुन्हेगारी खटले प्रलंबित

पालकही संभ्रमात

“अशा नात्यांबाबत तरुणांच्या पालकांच्या मनातही संभ्रम स्थिती आहे. मुलांनी स्वीकारलेले नातं जपायचं की आपल्या संस्कृतीच्या मर्यादेत मुलांना ठेवायचं याबाबत पालक साशंक आहेत”, असं न्यायालयाने म्हटलं.

नेमकं प्रकरण काय?

एका मुलीच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या आरोपीला जामीन मंजूर करताना न्यायालयाने ही निरीक्षणे नोंदवली आहेत. संबंधित प्रकरणात कथित आरोपीने प्रेयसीच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे दिसत नाही, असं न्यायालयाने म्हटलं आहे.

Story img Loader