आंतरधर्मीय जोडप्यांची व विशेषत: हिंदू मुलगी व मुस्लीम पुरूष अशा जोडप्यांची नावं असलेली 100 जणांची लिस्ट नुकतीच व्हायरल झाली होती व हा लव्ह जिहादचा दाखला असल्याचं सांगण्यात आलं होतं. या जोडप्यांना धमक्या देण्यात येतील व काही हिंसक घटना घडू शकतील अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. ती खरी ठरली असून या यादीमधल्या एका जोडप्यानं कोलकाता पोलिस ठाण्यात धमकीची तक्रार दाखल केली आहे. जीवे मारण्याच्या धमक्या आल्याची तक्रार या यादीतल्या एका जोडप्यानं केली आहे.

फेसुबक व ट्विटरवर गेल्या महिन्यांत 100 जोडप्यांच्या प्रोफाइलची यादी व्हायरल झाली होती. हिंदू मुली लव्ह जिहादच्या शिकार होत असून या यादीमध्ये जे पुरूष आहेत त्यांना शोधून त्यांची शिकार हिंदू वाघांनी करावी अशी उघड चिथावणीदेखील देण्यात आली होती. हिंदू वार्ता नावानं असलेल्या फेसबुकपेजवर ही चिथावणी देण्यात येत होती, जे नंतर डिलीट करण्यात आले.

तर विश्व हिंदू परिषदेचे बिपलब चट्टोपाध्याय यांनी हिंदू मुलींना लव्ह जिहादच्या माध्यमातून इस्लाम स्वीकारण्यास बाग पाडण्यात येत असल्याचा आरोप केला होता आणि हिंदूंनी जागं व्हावं अन्यथा भारत गमावाल अशी चिथावणी दिली होती.

या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधल्या हिंदू मुलगी व मुस्लीम तरूण असलेल्या एका जोडप्याला त्या व्हायरल पोस्टनंतर धमक्या येण्यास सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावरही त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. आमच्याकडे तक्रार दाखल झाली असून आम्ही तपास करत आहोत असे पोलिसांनी सांगितले. आम्हाला काही जणांनी लक्ष्ये केलंय तसेच जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्यात अशी या जोडप्यानं तक्रार केली आहे.

माझ्या मैत्रिणीनं त्या यादीत आमच्या दोघांची नावं बगितलं आणि ती गर्भगळीत झाली व तिनं ही बाब माझ्या निदर्शनास आणली असं त्या तरूणानं म्हटलं आहे. तिला सोशल मीडियावर त्रास देण्यात आल्याचं व त्यामुळे तिनं सोशल मीडियाच सोडल्याचं त्या तरुणानं सांगितलं.
तर या यादीत नाव आलेल्या दुसऱ्या एका मुलीच्या वडिलांनी माजी मुलगी एका प्रतिष्ठित कंपनीत काम करते, ती घरी आली की पोलीसांत तक्रार करायची का नाही याचा निर्णय घेऊ असे इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले.

तर याच यादीतल्या आणखी एका मुलीनं तो मुला माझा आधी बॉयफ्रेंड होता परंतु आता त्याच्याशी माझा काही संबंध नाही असं म्हटलंय. तसंच आपल्या जीवाला काही धोका होईल का अशी भीतीही तिला सतावत आहे. तर मोहम्मद शाहिद नावाच्या तरुणानं त्या यादीत नाव आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे. एक मुस्लीम मुलगा व हिंदू मुलगी मित्रमैत्रीण असू शकत नाहीत का असा सवाल त्यानं विचारला आहे. आमच्याबद्दल असं लिहायचा कुणाला अधिकार नसल्याचं सांगत आपण पोलिसांकडे तक्रार करू शकतो असं त्यानं म्हटलं आहे.

हिंदू मुलींना फूस लावून पळवण्यात येत असल्याचा व नंतर त्यांचं धर्मपरीवर्तन करण्यात येत असल्याचा आरोप चट्टोपाध्याय यांनी केला आहे. हिंदू मुलगा मुस्लीम मुलीसी लग्न करतो तेव्हा त्याचा खून करण्यात येतो त्यावेळी मात्र प्रसारमाध्यमं दखल घेत नाहीत असा आरोपही चट्टोपाध्याय यांनी केला आहे.

Story img Loader