स्त्री आणि पुरुष ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये दीर्घकाळ एकमेकांसोबत राहात असतील, तर त्यांना विवाहित दाम्पत्याचा दर्जा देण्यात येऊ शकतो, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. औपचारिकपणे विवाह न करताही जोडीदारासोबत राहणारी स्त्री जोडीदाराच्या मृत्यूनंतर त्याच्या संपत्तीमध्ये हक्क मागू शकते, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायमूर्ती एम. वाय. इक्बाल आणि न्या. अमितवा रॉय यांच्या पीठाने हा निकाल दिला. एखादी स्त्री आणि पुरुष ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये खूप वर्षांपासून एकमेकांसोबत राहात असतील, तर कायद्याच्या दृष्टिने त्यांना पती-पत्नीचा दर्जा देण्यात येऊ शकतो. त्यामुळे स्त्री किंवा पुरुष दोघेही एकमेकांच्या संपत्तीमध्ये वाटा मागू शकते, असे न्यायालयाने सांगितले.
‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राहणाऱया स्त्री किंवा पुरुषाला एकमेकांना संपत्तीमध्ये कायदेशीर हक्क द्यायचा नसेल, तर त्यासाठी त्यांना भक्कम पुरावा द्यावा लागेल. तो न्यायालयात स्वीकारला गेल्यासच त्यांना कायदेशीर हक्कांमधून सूट मिळू शकेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा