करोना संकटामुळे ठरवलेली सर्वच नियोजनं विस्कटली आहेत. विवाहसोहळ्यातून मोठ्या प्रमाणात करोनाचा संसर्ग पसरत असल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे सरकारने लग्नात पाहुण्यांच्या येण्यावर बंधनं घातली आहेत. बंधनं पाहता अनेकांनी ठरलेली लग्न पुढे ढकलली आहेत. काही दिवसात करोना आटोक्यात येईल याची अनेक जोडपी वाट बघत आहेत. आता उत्तराखंडमधील एका जोडप्यानं यावर एक पर्याय शोधून काढला आहे. नातेवाईकांनाही राग येणार नाही आणि लग्नही निर्विघ्नपणे पार पडेल यासाठी एक युक्ती शोधली आहे. पुढच्या आठवड्यात लग्न असल्याने पाहुण्यांना करोना चाचणी करुन अहवाल आणण्याचं आवाहन जोडप्याने निमंत्रण पत्रिकेतून केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

करोनाची फैलाव रोखण्यासाठी देण्यात आलेली सर्व नियमावली लग्नात पाळली जाणार आहे. १८ एप्रिलला विजय आणि वैशाली यांचा लग्न टिका सोहळा हरिद्वार येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमाला घरातील १८ जण उपस्थित राहणार आहेत. त्या सर्वांना आरटी-पीसीआर चाचणी करण्यास सांगितलं आहे. कार्यक्रमावेळी चाचणी अहवाल आणण्यास सांगितलं आहे. त्यानंतर २४ एप्रिलला जयपूरमध्ये विवाह सोहळा पार पडणार आहे.

दुर्दैवी! करोनामुळे १४ दिवसांच्या बाळाचा मृत्यू

‘विजय आणि वैशालीचा विवाह २४ एप्रिलला जयपूरमध्ये आहे. यासाठी आम्ही नातेवाईकांना निमंत्रण पत्रिका दिली आहे. त्यात आरटी-पीसीआर चाचणी करण्याचं आवाहन केले आहे. तसेच लग्नात मास्क आणि सॅनिटायझर बंधनकारक केले आहे. जेणेकरून नियमावली पालत लग्न सोहळ्याचा आनंद लुटता येईल.’, असं विजयचा लहान भाऊ अजय सिंहने सांगितलं. ‘करोनाचा फैलाव पाहता आम्ही सर्व काळजी घेणार आहोत. लग्नात सरकारने सांगितल्याप्रमाणे फक्त ५० माणसांना निमंत्रण आहे. त्याच्यावर एकही पाहुणा नसेल. हे आम्ही सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टीने करत आहोत’, असंही त्याने पुढे सांगितलं.

देशात ऑक्सिजन वाहतूक करण्याऱ्या टँकर्सना सूट; आढावा बैठकीत पंतप्रधान मोदींचा निर्णय

विवाहसोहळ्यात होणारी गर्दी आणि त्या माध्यमातून करोनाचा फैलाव होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे उत्तराखंडमधील दाम्पत्याने उचललेलं पाऊल वाखण्याजोगं आहे.