अंधश्रद्धा माणसाकडून कुठलं पाऊल उचलेल हे सांगता येणं जवळपास कठीण आहे. अंधश्रद्धा माणसाला कुठल्याही थराला नेऊ शकते. कुणाचा बळीही घेऊ शकते तर कधी माणूस यामध्ये स्वतःचं आयुष्यही संपवू शकतो. गुजरातमध्ये अशाच अंधश्रद्धेपोटी पती आणि पत्नीने आत्महत्या करत स्वतःचा बळी दिला आहे. गिलोटीन सारखं उपकरण या दोघांनी घरीच तयार केलं होतं. या दोघांनीही आत्महत्या केली. या दोघांनीही मागे सुसाईड नोटही ठेवली आहे. हेमूभाई मकवाना आणि हंसाबेन अशी या दोघांची नावं आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी या प्रकरणात नेमकं काय सांगितलं आहे?

विंछिया पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक इंद्रजित सिंह जडेजा यांनी सांगितलं की विंछिया गावातल्या आपल्या शेतात एका झोपडीसारख्या घरात हेमूभाई आणि हंसाबेन यांनी ब्लेडसारख्या हत्याराने आपलं शीर कापून घेत आत्महत्या केली. शीर कापल्यानंतर ते अग्निकुंडात पडेल याची व्यवस्था या दोघांनी आत्महत्येच्या आधीच केली होती. या ठिकाणी आम्हाला एक सुसाईड नोट मिळाली आहे.

पती आणि पत्नीने आधी स्वतःचा अग्निकुंडात स्वतःला झोकून देण्याआधी स्वतःचं शीर धडावेगळं केलं. गिलोटीन सारखं वापरून पती आणि पत्नीने स्वतःला अग्निकुंडात झोकलं आहे. ही धक्कादायक घटना गुजरातच्या राजकोटमध्ये घडली आहे.

गिलोटीनसारख्या हत्याराचा आत्महत्येसाठी उपयोग

जडेजा यांनी सांगितलं की या पती-पत्नीने दोरील्या बांधलेल्या गिलोटीनसारख्या यंत्राचा उपयोग आत्महत्येसाठी केला. त्या यंत्राच्या खाली आपलं शीर ठेवण्याआधी एक अग्निकुंड तयार केलं होतं. त्यांनी या उपकरणाची दोरी सोडल्यानंतर त्याला बांधलेलं ब्लेड या दोघांच्या मानेवर चाललं आणि दोघांचंही शीर अग्निकुंडात पडलं. शनिवारी रात्री उशिरा हे अनुष्ठान त्या दोघांनी केलं असं त्यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.

वर्षभरापासून करत होते पूजा

हेमूभाई आणि हंसाबेन हे दोघंही मागच्या वर्षभरापासून या झोपडीत येऊन पूजा करत होते असं त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं. या दोघांना दोन मुलं आहेत. तसंच आई वडील आणि इतर नातेवाईकही आहेत. जडेजा यांनी सांगितलं की कुटुंबाला जसं या घटनेबाबत कळलं तसं त्यांनी आम्हाला सांगितलं. रविवारी सकाळी हा प्रकार आम्हाला समजला. त्यानंतर आम्ही घटनास्थळी आलो. घटनास्थळी आम्हाला एक सुसाईड नोट मिळाली आहे. या नोटमध्ये या दोघांनीही आमच्या आई वडिलांची आणि मुलांची काळजी घ्यावी. तसंच नातेवाईकांची काळजी घ्यावी असं म्हटलं आहे. या प्रकरणात आम्ही अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. तसंच या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत असंही पोलिसांनी सांगितलं. News 18 ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Couple uses guillotine like device to behead self make severed heads roll into fire pit in gujrat scj
Show comments