व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी घरच्यांना न सांगता गोव्यात गेलेल्या एका प्रेमीयुगुलाचा गोव्यातील समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे प्रेमीयुगुल मुळचे उत्तर प्रदेशमध्ये राहणारे होते. ही घटना दक्षिण गोव्यातील पालोलेम समुद्रकिनाऱ्यावर ही घटना घढली. प्रेमीयुगुल बुडत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जीवरक्षकांच्या मदतीने दोघांनाही किनाऱ्यावर आणण्यात आले. पोलिसांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत असल्याचे घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदन अहवालासाठी मृतदेह पाठविण्यात आले आहेत. मृत मुलीचे नाव सुप्रिया दुबे (२६) आणि मुलाचे नवा विभू शर्मा (२७) असल्याचे कळते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रेमीयुगुल उत्तर प्रदेशमध्ये राहणारे होते. व्हॅलेंटाईनच्या आधीच ते गोव्यात आले होते. मृत सुप्रिया दुबे सध्या बंगळुरु येथे राहत होती. तर विभू शर्मा हा मुंबईत राहत होता. दोघेही एकमेकांचे नातेवाईक असल्याचेही माहिती मिळत आहे. सोमवारी रात्री काही पर्यटकांनी त्या दोघांनाही समुद्रकिनारी फिरताना पाहिले होते. पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर कळले की, दोघांच्याही घरातल्यांना ते गोव्याला जात असल्याचे माहीत नव्हते.

हेराल्ड गोवा या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, पालोलेम बिचवर रात्रीचे जेवण आणि कॉकटेल घेतल्यानंतर ते दोघे समुद्रात पोहायला गेले होते. पोलिसांना दोघांचे मृतदेह मिळाल्यानंतर त्यांची ओळख पटवण्याचे आव्हान होते. मात्र मुलीचा मोबाईल समुद्रकिनारी आढळून आला. तिच्या बोटांच्या ठश्यांनी मोबाईलचे लॉक उघडल्यानंतर मृत मुलीची माहिती मिळवण्यात पोलिसांना यश आले. ते दोघे गोव्यातल्या व्हिसिनीटी रिसॉर्टवर थांबले होते.

विभू शर्मा हा कवि होता, तसेच तो ब्लॉगिंगही करायचा, अशी माहिती मिळत आहे. सोशल मीडियावर त्याच्या कवितांचे व्हिडिओ देखील आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Couple went to goa to celebrate valentine day without inform parents died due to drowning at palolem beach in goa kvg