पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी नॅशनल असेम्ब्लीमध्ये खोटे बोलून देशाची दिशाभूल केल्याच्या कारणावरून त्यांना पंतप्रधान म्हणून अपात्र घोषित करण्याची मागणी करणारी याचिका नॅशनल असेम्ब्लीच्या सभापतींनी फेटाळून लावली.
मागील महिन्यात इम्रान खान आणि ताहिरुल कादरी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी पाकिस्तानच्या नॅशनल असेम्ब्लीचा घेराव केल्याने कठीण पेचप्रसंग निर्माण झाला होता.
 ही कोंडी फोडण्यासाठी नवाझ शरीफ यांनी लष्कराची मदत मागितली होती. परंतु आपण अशी मदत मागितली नाही, अशी सरळ खोटी माहिती त्यांनी नॅशनल असेम्ब्लीमध्ये दिली होती. मात्र शरीफ यांनी मदत मागितली होती, असा खुलासा थेट लष्करानेच केल्याने शरीफ उघडे पडले होते.