पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांच्या परदेशगमनावर घालण्यात आलेली बंदी उठविण्याचा निर्णय गुरुवारी पाकिस्तानी न्यायालयाने दिला आह़े  मुशर्रफ यांचे नाव परदेशगमन नियंत्रण यादीतून वगळण्यात यावे, असे आदेश न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत़  त्यामुळे आता मुशर्रफ यांचा पाकिस्तान सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आह़े  सिंध उच्च न्यायालयाचे न्या़ मोहम्मद अली मझहर आणि न्या़ शाहनवाझ यांच्या खंडपीठाने मुशर्रफ यांच्या याचिकेवर सकारात्मक निर्णय घेत त्यांना दिलासा दिला़  अरब अमिरातीत राहणाऱ्या आजारी आईला भेटता यावे, म्हणून मुशर्रफ यांना ही सवलत देण्यात आली आह़े

Story img Loader