कोळसा खाणवाटप घोटाळा चौकशी पथकातील पोलीस अधीक्षक विवेक दत्त आणि अन्य तिघांच्या कोठडीत दिल्ली न्यायालयाने बुधवारी आणखी पाच दिवसांची वाढ केली.
विवेक दत्त यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. या खटल्यास विविध कंगोरे असल्याने या पोलिसांच्या कोठडीत वाढ करण्यात आल्याचे विशेष सीबीआय न्यायमूर्ती जी. पी. सिंग म्हणाले. आरोपींना १७ मे रोजी अटक करण्यात आली, १८ मे रोजी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आणि अद्यापही ते पोलीस कोठडीत आहेत.
या प्रकरणामागील सत्य खणून काढण्यासाठी त्याचप्रमाणे अन्य बाबींचा तपास करण्यासाठी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करणे गरजेचे आहे, असे सीबीआयने स्पष्ट केले. त्यामुळे न्यायालयाने २७ मेपर्यंत पोलीस कोठडीला मुदतवाढ दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा