हिज्बुल मुजाहिदीनचा संशयित दहशतवादी लियाकत शहा याला एनआयएच्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी त्याला अटक केली होती.
जिल्हा न्यायाधीश एल. एस. मेहता यांनी शहाला २० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय देश सोडून जाऊ नये, असा आदेशही न्यायालयाने शहा याला दिला आहे. त्याचबरोबर त्याच्यावर इतरही काही निर्बंध लादण्यात आले होते.
गेल्या २० मार्च रोजी लियाकतला त्याच्या कुटूंबियांसह गोरखपूरजवळ अटक करण्यात आली. तो त्यावेळी नेपाळची सीमारेषा ओलांडण्याच्या तयारीत होता. ४५ वर्षांच्या लियाकतने आपण जम्मू-काश्मीर सरकारच्या पुनर्वसन धोरणानुसार आत्मसमर्पण करण्यासाठी आलो असल्याचे पोलिसांना सांगितले होते.

Story img Loader