बेकायदेशीरपणे आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत घुसल्याप्रकरणी श्रीलंकेच्या नौदलाकडून अटक करण्यात आलेल्या आठ भारतीय मच्छिमारांची श्रीलंका न्यायालयाने शुक्रवारी सुटका केली.
आपल्या हद्दीत घुसल्याचा आरोप करीत १५ जून रोजी श्रीलंकेच्या नौदलाने आठ भारतीय मच्छिमारांना अटक केली होती. या मच्छिमारांना तेव्हापासून न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. याप्रकरणी मन्नर येथील न्यायालयातील न्या आनंधी कनकरथिनम यांच्यापुढे शुक्रवारी सुनावणी झाली असता या मच्छिमारांना सोडून देण्याचे आदेश देण्यात आले.
दरम्यान, श्रीलंकेच्या नौदलाने वेगवेगळ्या दिवशी अटक केलेले अन्य ४१ मच्छिमार अद्याप श्रीलंकेच्या ताब्यात आहेत. या मच्छिमारांच्या कोठडीत २२ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आल्याची माहिती मच्छिमार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

Story img Loader