पाकिस्तानचे पंतप्रधान रझा परवेझ अश्रफ यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करीत असलेले ज्येष्ठ अधिकारी कामरान फैज़्‍ाल यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करण्यासाठी सोमवारी न्यायालयीन आयोग नेमण्यात आला.
राष्ट्रीय उत्तरदायित्व आयोगाचे सहायक संचालक असलेले फैज़्‍ाल हे भ्रष्टाचारविरोधी प्रकरणांच्या तपासातले जाणते अधिकारी होते. पंतप्रधान अश्रफ यांचा तपास त्यांच्याकडे आल्यानंतर शुक्रवारी सरकारी विश्रामगृहात पंख्याला गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्या शरीरावर असंख्य जखमा होत्या, असा आरोप करीत त्यांच्या नातेवाईकांनी या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केल्याने सरकारविरोधी आंदोलनालाही धार आली. त्यामुळे हा आयोग नेमण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश जावेद इक्बाल या आयोगाचे अध्यक्ष असतील. याआधी ओसामा बिन लादेनचे पाकिस्तानातील गुप्त वास्तव्य आणि अमेरिकेच्या धडक मोहिमेत त्याचा झालेला खात्मा याचीही चौकशी करण्यासाठी इक्बाल यांच्याच अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमला गेला होता.
सर्वोच्च न्यायालयाने गेल्या मार्चमध्ये ऊर्जा घोटाळ्यासंबंधात अश्रफ यांच्यासह २० जणांची चौकशी करण्याचे आदेश राष्ट्रीय उत्तरदायित्व आयोगाला दिले होते. त्यानंतर फैज़्‍ाल हे अन्य एका अधिकाऱ्याने हा तपास केला. त्याचा अहवाल त्यांनी वरिष्ठांना दिल्यानंतर या दोघांना निलंबित करण्यात आले आणि पाठोपाठ फैज़्‍ाल यांचा संशयास्पद मृत्यू ओढवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा