नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी नोंदविण्यात आलेल्या एफआयआर (गुन्ह्याची प्रथम माहिती)शी संबंधित कोणतीही बाब किंवा साहित्याचा कोणत्याही स्वरूपात वापर करू नये, असे आदेश येथील एका न्यायालयाने सोमवारी एका वृत्तवाहिनाला दिले. 

दिल्ली पोलिसांनी याबाबत लिंक न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश राकेश कुमार सिंह यांच्याकडे अर्ज केला होता. श्रद्धा वालकर हिच्या हत्येप्रकरणी दाखल झालेल्या एफआयआरशी संबंधित कोणतीही बाब प्रसारित करण्यास आज तक आणि अन्य वृत्तवाहिन्यांना मनाई करावी, असे त्यात म्हटले होते. या अर्जावरील सुनावणीदरम्यान न्यायाधीश म्हणाले की, या अर्जावर तातडीने आदेश दिला नाही तर, अर्जाच्या हेतूला हरताळ फासला जाईल. त्यामुळे सुनावणीच्या पुढील तारखेपर्यंत आज तक या वाहिनीने एफआयआरशी संबंधित कोणत्याही बाबीचा कोणत्याही स्वरूपात वापर करू नये. या अर्जावर १७ एप्रिल रोजी तपशीलवार सुनावणी केली जाईल.

Congress
Congress : तेलंगणात काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप होणार? निवडणुकींच्या तोंडावर १० आमदारांनी घेतली गुप्त बैठक
Sandeep Narayan Sings Marathi Song Kanda Raja Pandhricha
कर्नाटकी शास्त्रीय गायक संदीप नारायण जेव्हा ‘कानडा राजा…
Crime
Crime News : धक्कादायक! मेहुणीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; गुन्ह्यासाठी लागणार्‍या पैशांसाठी बँककडून घेतलं ४० हजारांचं कर्ज
What Narendra Modi Said?
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य, “नेहरू-इंदिरा गांधींपासून काँग्रेसच्या सरकारांमध्ये १२ लाखांवर ३ लाखांचा कर…”
Haryana Bus Accident
Haryana : धक्कादायक! टोल वाचवण्यासाठी बस चालकाने टोल कर्मचाऱ्याला चिरडलं, घटनेचा व्हिडीओ व्हायरल
Accident
Accident : बाईकवर स्टंट करणाऱ्याला वाचवताना घात झाला, कारची ५ वेळा पलटी; कुंभमेळ्यावरून परतणारे ५ नेपाळी भाविक ठार
Natalie Winters Dress Controversy
Natalie Winters Dress Controversy : व्हाईट हाऊस प्रतिनिधीच्या स्वेटरवरून वाद… महिला पत्रकारानं दिलं प्रत्युत्तर; म्हणाली, “माफ करा? द्वेष करणारे…”
Nashik-Gujarat highway Accident
Nashik-Gujarat Highway Accident : नाशिक-गुजरात महामार्गावर भीषण अपघात! भाविकांनी भरलेली बस दरीत कोसळली; ७ जणांचा मृत्यू
Maha Kumbh Mela Stampade
Maha Kumbh Mela Stampade : महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीमागे कट? पोलिसांनी सुरू केली १६ मोबाइल क्रमांकांची चौकशी

राज्यघटनेच्या अनुच्छेद २१ मध्ये जिवित आणि व्यक्तीस्वातंत्र्याचे रक्षण यांची ग्वाही दिली आहे. त्यातच व्यक्तीच्या मानसिक स्थितीचे रक्षणही अंतर्भूत आहे. या हत्येप्रकरणातील संवेदनशील माहिती प्रसारित झाल्यास त्याचा आरोपीच्या मानसिक स्थितीवर निश्चितच परिणाम होऊ शकतो. पीडितेच्या कुटुंबीयांच्या मानसिक स्थितीवरही याचा परिणाम होऊ शकतो, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

या प्रकरणाशी संबंधित ध्वनीचित्रफिती किंवा मुद्रण हे आता न्यायालयीन दस्ताचा भाग बनले आहे. असे दस्त कोणी कायदेशीर किंवा बेकायदा मार्गाने मिळविले असले तरी ते न्यायालयाच्या परवानगीशिवाय प्रसारित करता येणार नाही. त्याशिवाय आरोपपत्र हासुद्धा सार्वजनिक दस्तावेज नाही, याकडे न्यायालयाने लक्ष वेधले.

आक्षेप काय? सुनावणीदरम्यान न्यायाधीश म्हणाले की, आरोपीच्या नार्को चाचणीचे विशिष्ट मुद्रण किंवा संवाद प्राक्टो अ‍ॅपद्वारे प्रसारित करण्याची आज तक वाहिनीची तयारी असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. तसे झाल्यास त्यामुळे या खटल्याच्या सुनावणीस बाधा पोहोचेल, तसेच आरोपी आणि पीडितेच्या कुटुंबीयांवरही परिणाम होईल, असे सरकार पक्षाचे म्हणणे आहे. हे प्रकरण संवेदनशील असल्याने त्यातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही उद्भवू शकतो.

Story img Loader