सार्वजनिक निधीचा निवडणूक प्रचारातील जाहीरातींसाठी वापर केल्याप्रकरणी दिल्लीतील स्थानिक न्यायालयाने पोलिसांना दिल्लीच्या मुख्यमंत्री शिला दीक्षित यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
शिला दीक्षित यांनी २००८ सालच्या निवडणूक प्रचारासाठी सार्वजनिक निधीचा वापर केला असल्याचा आरोप करणारी याचिका दिल्लीचे माजी मुख्यमंत्री विजेंदर गुप्ता आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक गर्ग यांनी स्थानिक न्यायालयात दाखल केली होती. त्यावर निकाल देताना न्यायाधिश नरोत्तम कौशल यांनी स्थानिक पोलीस ठाण्याला याचिकाकर्त्यांची तक्रार दाखल करुन घेण्यास सांगितली असून त्यासंबंधिच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.    
याचिकाकर्त्यांनी जून महिन्यात दिक्षित यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. निवडणूक प्रचारातील जाहीरातींसाठी शिला दीक्षित यांनी तब्बल २२.५६ कोटी सरकारी निधीतून वापरले असल्याचे याचिकेत म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा