दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर बिहारी निर्वासितांविरोधात वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश येथील स्थानिक न्यायालयाने मंगळवारी दिले आहेत.  एका वकिलाने राज ठाकरेंविरोधात न्यायालयात तक्रार केल्यानंतर पश्चिम चंपारण जिल्ह्य़ाचे मुख्य न्या. मनोज कुमार सिंग यांनी ठाकरेंविरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. राज ठाकरे आपल्या भडकावू भाषणांनी देशाच्या ऐक्याला धोका पोहोचवत असल्याची तक्रार तक्रारदार वकिलाने न्यायालयाकडे केली आहे. त्यानुसार न्यायालयाने राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश शहर पोलीस ठाण्याला दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Court orders registration of case against raj thackeray