कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपी संजय रॉयला शनिवारी विशेष न्यायालयाने दोषी ठरवलं. आता या प्रकरणी आज सियालदह न्यायालयाने आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.याप्रकरणी पश्चिम बंगाल सरकारने पीडित मुलीच्या कुटुंबीयांना १७ लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाने दिले. मात्र, ही नुकसानभरपाई तिच्या पालकांनी नाकारली आहे.

संजय रॉय (३३) वर्षीय रुग्णालयातील स्वयंसेवकाला कोलकाता न्यायालायने दोन दिवसांपूर्वी दोषी ठरवलं. त्याच्यावर त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायाधीश अनिर्बन दास यांनी खटल्याच्या अध्यक्षतेखालील सियालदह न्यायालयात आपला निर्णय सुनावला. त्यांनी पश्चिम बंगाल सरकारला पीडितेच्या पालकांना १७ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले. सुनावणीदरम्यान पीडितेच्या पालकांनी न्यायाधीशांना सांगितलं की त्यांना नुकसान भरपाई नको, त्यांना न्याय हवा आहे. यावर न्यायाधीशांनी म्हटलं की, याबाबत आधीच आदेश देण्यात आले होते. त्यांनी हे पैसे त्यांना हवे तसे वापरावेत. तसंच, बलात्कार आणि हत्येसाठी ही नुकसानभरपाई नसून कायदेशीर तरतुदींचा भाग म्हणून ही रक्कम दिली जात आहे, असं न्यायालयाने स्पष्ट केलं.

कोर्टात काय घडलं?

कोलकाता येथील आर. जी कर मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालयात एका डॉक्टरची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. त्याआधी तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तिच्या मृतदेहावर अनेक जखमा होत्या. ९ ऑगस्ट २०२४ ला ही घटना घडली होती. या घटनेचा देशभरातून निषेध करण्यात आला. या घटनेवरुन देशभरातले डॉक्टर हे त्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आक्रमक झाल्याचं शनिवारी पाहण्यास मिळालं. या घटनेतले नवे पैलू रोज समोर येत होते. तसंच आर. जी. कर महाविद्यालय आणि रुग्णालयातील ट्रेनी विद्यार्थ्यांनी सुमारे दीड महिना आंदोलन केलं होतं. कोलकाता बलात्कार प्रकरणातला मुख्य आरोपी संजय रॉय हा रुग्णालयातील डॉक्टरवर बलात्कार करण्याआधी आणि तिची हत्या करण्याआधी तो रेड लाइट एरियात गेला होता अशी माहिती समोर आली होती. हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं आहे. सेलदाह कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरु असून आज दुपारी २.४५ वाजता संजय रॉयला शिक्षा सुनावली जाणार आहे.

Story img Loader