Raping 80 year old bedridden woman : अंथरुणाला खिळलेल्या ८० वर्षांच्या महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने १२ वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सदर गुन्हा सामाजिक आणि नैतिक मूल्यांना धक्का पोहोचवणारा आहे, असेही न्यायालयाने म्हटले. सदर गुन्हा २०२२ साली घडला होता. पीडितेने साक्ष देताना म्हटले होते की, तिने आरोपीस हात जोडून विनंती केली तरी आरोपी थांबला नाही. न्यायालयाने म्हटले की, आरोपीने आपली वासना शमविण्यासाठी हे लाजिरवाणे कृत्य केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश आंचल यांनी या खटल्याची सुनावणी घेत निकाल दिला. आरोपी अंकित उर्फ मोगली याच्याविरोधात बलात्कार, घुसखोरी, दरोडा टाकणे आणि मारहाण करण्यासारखे गुन्हे सिद्ध झाले आहेत.

हे वाचा >> ‘फक्त महिला म्हणून पाहू नका’, वायनाडमध्ये नदीवर पूल उभारणाऱ्या सीता शेळके कोण आहेत?

फिर्यादी पक्षाने न्यायालयात सांगतिले की, अंकित चोरीच्या उद्देशाने घरात शिरला होता. पीडित महिलेचे कमरेच्या खालचे शरीर काम करत नसल्यामुळे ती अनेक वर्ष अंथरुणाला खिळून आहे. अंकितने महिलेची अवस्था पाहून तिच्यावर बळजबरी केली. तसेच तिला मारहाण करून मोबाइल आणि इतर वस्तू चोरी करून पळ काढला.

पीडित महिलेने आपल्या जबाबात न्यायालयाला म्हटले की, ती आरोपीला हात जोडून विनंती करत होती. मात्र आरोपीने तिचे म्हणणे न ऐकता दुष्कृत्य केले. या हल्ल्यानंतर जेव्हा पीडितेची वैद्यकीय तपासणी केली गेली, तेव्हा तिचा चेहरा, हात आणि छातीवर जखमांच्या खुणा आढळून आल्या. न्यायालयाने निकाल देताना म्हटले की, बलात्कारासारखा गुन्हा हा पीडितेच्या आत्म्याला वेदना देणारा आहे. यामुळे पीडित महिला संपूर्ण आयुष्य अपमानित होऊ जगते. तिचा आत्मविश्वास नाहीसा होतो. हा गुन्हा सामाजिक आणि नैतिक मूल्यांना धक्का देणारा आहे.

न्यायालयाने पुढे म्हटले की, गुन्हा कसा घडला? याचे पुरावे आपल्यासमोर नाहीत. मात्र आरोपीने केवळ आपली वासना शमविण्यासाठी हे कृत्य केले, असे दिसते. त्याने पीडितेला केवळ वासना शमविण्याचे साधन बनविले. न्यायालयाने आरोपीचे वय, त्याची कौटुंबिक जबाबदारी आणि त्याला सुधारण्याची संधी देण्याबाबतचा विचार करून १२ वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच पीडितेला योग्य मोबदला देण्यासाठी हे प्रकरण दिल्लीच्या न्यायिक सेवा प्राधिकरणाकडे पाठविले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Court sentences man to 12 years imprisonment for raping 80 year old bedridden woman kvg