भारताची स्वदेशी लस कोव्हॅक्सिन ब्राझील व्हेरियंटच्या करोना विषाणूवरही प्रभावी असल्यादा वादा आयसीएमआरनं केला आहे. कोव्हॅक्सिन युके व्हेरियंट, B.1.1.7 आणि महाराष्ट्रातील B.1.617 वरही कार्यक्षम असल्याचं यापूर्वीच निष्पन्न झालं आहे. कोव्हॅक्सिन भारत बायोटेकनं आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी (एनआयव्ही) यांच्यासोबत मिळून तयार केली आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी आणि आयसीएमआरनं ब्राझील व्हेरियंट B.1.128.2 या करोना विषाणूवर सखोल अभ्यास केला. यासाठी त्यांनी कोव्हॅक्सिनचे दोन डोस एका विषाणूबाधित व्यक्तीला दिले होते. त्यानंतर त्या व्यक्तीमध्ये करोना विषाणूंशी लढण्याची क्षमता वाढल्याचं दिसून आलं. ब्राझील व्हेरियंटला यापूर्वी B.1.1.248 हे नावं देण्यात आलं होतं. त्यानंतर त्यात बदल करत B.1.128.2 यात वर्गीकरण करण्यात आलं. हा व्हेरियंट पी १ आणि पी २ प्रकारातील असल्याचं मान्य केलं होतं. मात्र आता आता हा विषाणू एकाच प्रकारचा असल्याचं समोर आलं आहे. हा विषाणू ब्राझील आणि जगातील इतर भागात पसरला आहे.
कोव्हॅक्सिन करोनाच्या ब्राझील व्हेरियंटवरही प्रभावी; आयसीएमआरचा दावा
कोव्हॅक्सिन भारताची स्वदेशी लस
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 03-05-2021 at 16:15 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covaxin also effective on the brazilian variant of the corona icmr claims rmt