कोव्हॅक्सिन करोनाविरुद्धच्या लढाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.मात्र असं असलं तरी जागतिक आरोग्य संघटनेकडून आपत्कालीन सूचीत स्थान मिळालेलं नाही. मात्र येत्या ४ ते ६ आठवड्यात यावर निर्णय होईल, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथन यांनी स्पष्ट केलं आहे. सेंटर फॉर सायन्स अँड इन्वायरमेंटने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये त्यांनी याबाबत सांगितलं. कोव्हॅक्सिनचे निर्माते भारत बायोटेक याबाबतची सर्व आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेच्या पोर्टलवर अपलोड करत आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटना याचं परीक्षण करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

करोना लस निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडनं कोव्हॅक्सिन संदर्भातील ९० टक्के दस्ताऐवज जागतिक आरोग्य संघटनेकडे जमा केले आहेत. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड आणि यूरोपियन यूनियनने अजूनही कोव्हॅक्सिनला आतत्कालीन मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे त्यांनी भारत बायोटेककडून आणखी माहिती मागवली आहे. “तिसऱ्या टप्प्यातील परीक्षण सुरु आहे. यासाठी सर्व आकडेवारी डब्ल्यूएचओच्या नियामक विभागाकडे जमा करावी लागते. त्यावर तज्ज्ञ समिती आपला अध्ययन करत असते. त्यात सुरक्षा, प्रभाव आणि उत्पादन गुणवत्तेकडे विशेष लक्ष दिलं जातं. भारत बायोटेकने याबाबतची प्रक्रिया पूर्ण केली आहे. आशा आहे की, येत्या चार ते सहा आठवड्यात कोव्हॅक्सिनला आपत्कालीन सूचीत स्थान मिळेल”, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितलं.

Zika विषाणूचा फैलाव!; केंद्र सरकारने केरळमध्ये पाठवली तज्ज्ञांची टीम

जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन सूचित मॉडर्ना, फायजर, एस्ट्राजेनेका, जॉनसेन (अमेरिका आणि नेदरलँडमध्ये), सिनोफार्मा/ BBIP आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियात तयार झालेल्या कोविशील्डचा समावेश आहे. मात्र कोव्हॅक्सिनला असूनही स्थान मिळालेलं नाही.

न्यूझीलंडच्या प्रसिद्ध YouTuber ला भारत सरकारनं टाकलं काळ्या यादीत!; पत्नीची कोर्टात धाव

गेल्या काही दिवसात करोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. मागच्या दोन आठवड्यात आफ्रिकेतील मृत्यूदर ३०-४० टक्क्यांनी वाढला आहे. “मागच्या २४ तासात ५ लाख नविन करोना रुग्ण आढळून आले आहेत. तर ९,३०० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. ही काय करोना कमी होण्याची लक्षणं नाहीत”, असं सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितलं. डेल्टा व्हेरिएंट हा सर्वाधिक घातक विषाणू आहे. या व्हायरसची लागण झालेला व्यक्ती ८ जणांना संक्रमित करतो. तेच प्रमाण करोनाच्या इतर व्हायरसमध्ये ३ इतकं आहे. त्यामुळे डेल्टा व्हायरस किती घातक आहे? याचा अंदाज येतो, असंही त्यांनी सांगितलं.

Story img Loader