देशातली करोनाची दुसरी लाट आता हळूहळू ओसरु लागली आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार करोनाची लाट सौम्य होताना दिसत आहे. दिवसेंदिवस बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून नवबाधितांची संख्या घटत आहे.
देशात काल दिवसभरात ३८ हजार ७९२ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता उपचाराधीन रुग्णांची संख्या ४ लाख २९ हजार ९४६ वर पोहोचली आहे. तर काल ४१ हजार करोना रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे आता बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या तीन कोटी १ लाख ४ हजार ७२० वर पोहोचली आहे. देशातला करोना रुग्ण बरे होण्याचा दर मात्र स्थिर आहे. आजही हा दर ९७.२८ टक्के इतका आहे.
India reports 38,792 new #COVID19 cases, 41,000 recoveries, and 624 deaths in the last 24 hours, as per Health Ministry
Total cases: 3,09,46,074
Total recoveries: 3,01,04,720
Active cases: 4,29,946
Death toll: 4,11,408Total vaccinated: 38,76,97,935 (37,14,441 in last 24 hrs) pic.twitter.com/wroOjdz1hc
— ANI (@ANI) July 14, 2021
तर देशात काल दिवसभरात ६२४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे आत्तापर्यंत मृत्यू पावलेल्या करोनारुग्णांची संख्या ४ लाख ११ हजार ४०८ वर पोहोचली आहे. तर देशाचा करोना मृत्यूदर आता १.३३ टक्क्यांवर पोहोचला आहे.
देशातली करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमही वेगात सुरु आहे. देशात काल दिवसभरात ३७ लाख १४ हजार ४४१ नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस घेतली. त्यापैकी २३ लाख ११ हजार ५०२ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला असून १४ लाख २ हजार ९३९ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. त्यामुळे देशातल्या लस घेतलेल्या नागरिकांची एकूण संख्या आता ३८ कोटी ७६ लाख ९७ हजार ९३५ वर पोहोचली आहे.