Coronavirus Vaccine For Kids : ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) आज ६ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनच्या मर्यादित वापरास परवानगी दिली आहे. याचबरोबर DCGI ने लस उत्पादकास पहिल्या दोन महिन्यांसाठी दर १५ दिवसांनी योग्य विश्लेषणासह प्रतिकूल घटनांच्या माहितीसह सुरक्षितता डेटा सबमिट करण्याचे निर्देश दिले आहेत.

आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारताच्या कोविड विरोधातील लढाईला आता आणखी बळकटी. ६ ते १२ वयोगटासाठी ‘कोव्हॅक्सिन’चे दोन डोस, ५ ते १२ वयोगटासाठी ‘कॉर्बेव्हॅक्स’ आणि १२ वर्षांवरील वयोगटासाठी ‘ZyCoV-D’ चे दोन डोसला आपत्कालीन परिस्थितीत प्रतिबंधित वापरास मंजूरी देण्यात आली आहे.

Story img Loader