Coronavirus Omicron India : देशात काल दिवसभरात २ लाख ५१ हजार २०९ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली, तर ६२७ करोना रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासात ३ लाख ४७ हजार ४४३ रुग्ण करोनामुक्त झाले असून आता २१ लाख ५ हजार ६११ रुग्ण उपचाराधीन आहेत.देशातला रुग्ण बाधित आढळण्याचा दैनंदिन दर आता १५.८८ टक्क्यांवर पोहोचला आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय आज दुपारी दक्षिणेकडील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत करोना परिस्थितीविषयी उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. या बैठकीसाठी तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, लक्षद्वीप, तेलंगणा, अंदमान आणि निकोबार बेटे या प्रदेशांचे आरोग्यमंत्री उपस्थित असतील.

दरम्यान, देशातल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण आता ओमायक्रॉनच्या BA.2 या उपप्रकाराचा संसर्ग झालेले आहेत. हा उपप्रकार या आधीच्या BA.1 या उपप्रकारापेक्षा अधिक संसर्गजन्य असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे संचालक डॉ. एस. के. सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात हे दोनच उपप्रकार आढळून आले आहेत. BA.3 हा तिसरा उपप्रकार अजून तरी आढळून आलेला नाही. अजूनही सर्वच ठिकाणी केवळ ओमायक्रॉनचे रुग्ण आढळत असल्याची परिस्थिती निर्माण झालेली नाही. ओडिशा, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात अजूनही डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झालेले रुग्ण अधिक प्रमाणात आढळत आहेत, असंही सिंग यांनी सांगितलं.

Live Updates

 

Coronavirus Omicron India : देशात काल दिवसभरात २ लाख ५१ हजार २०९ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली, तर ६२७ करोना रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासात ३ लाख ४७ हजार ४४३ रुग्ण करोनामुक्त झाले असून आता २१ लाख ५ हजार ६११ रुग्ण उपचाराधीन आहेत.देशातला रुग्ण बाधित आढळण्याचा दैनंदिन दर आता १५.८८ टक्क्यांवर पोहोचला आहे.

 

12:39 (IST) 28 Jan 2022
करोना रुग्णसंख्या कमी झालेल्या भागातल्या शाळा पुन्हा सुरू करा कारण...

करोना रुग्णसंख्या कमी झालेल्या भागांमधल्या शाळा पुन्हा सुरू करण्याची मागणी करत दिल्लीतल्या इन्स्टिट्यूट ऑफ जिनॉमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजीचे संचालक डॉ अनुराग अग्रवाल यांनी सांगितलं की, ही महामारी आता अशा टप्प्यात प्रवेश करत आहे, जिथे तुम्ही दैनंदिन जीवनक्रम पूर्ववत केला तरी हरकत नाही. पण केवळ काही छोट्या छोट्या खबरदारीच्या उपायांचं पालन करणं गरजेचं आहे.

12:33 (IST) 28 Jan 2022
भारत बूस्टर डोस धोरणाचं अंधानुकरण करणार नाही!

बूस्टर डोसच्या मुद्द्यावर WHO सोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर, केंद्राने सर्व वयोगटांसाठी कोविड लसीच्या बूस्टर डोसला मान्यता देण्याच्या धोरणावर पुनर्विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड-१९ साठी लसीकरणावरील नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप (NTAGI) ने जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि सांगितले की भारत त्याच्या बूस्टर डोस पॉलिसीवर आंधळेपणाने इतरांचे अनुकरण करणार नाही.

11:22 (IST) 28 Jan 2022
महाराष्ट्रात उपचाराधीन रुग्णांचा आलेख उतरणीला

मार्च २०२० पासून आतापर्यंत राज्यातील १२.४ कोटी लोकसंख्येपैकी ७३ लाख म्हणजेच ५.८ टक्के नागरिकांना करोनाची लागण झाल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे दिली आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांचा आलेख खाली येण्यास सुरुवात झाली आहे आणि १९ जानेवारीला नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात उपचाराधीन रुग्णांचा दर १०.१० टक्के असल्याचा दावाही सरकारने केला आहे.

11:21 (IST) 28 Jan 2022
केरळमध्ये ९४ टक्के रुग्ण ओमायक्रॉनचे

केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये करोना संसर्ग झालेल्या ९४ टक्के रुग्णांना ओमायक्रॉनची लागण झाली असल्याचं समोर आलं आहे. बाधित आढळणाऱ्या रुग्णांच्या नमुन्यांची संरचना सातत्याने तपासली जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.

11:17 (IST) 28 Jan 2022
महाराष्ट्रात मास्कमुक्ती होणार का? आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात...

इंग्लंड, डेन्मार्क, हॉलंड, युरोपीय राष्ट्रांमध्ये, अमेरिकेतही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मात्र त्या ठिकाणी विशेषतः युकेमध्ये मास्कमुक्ती करण्यात आलेली आहे, निर्बंध कमी केले आहेत. याबद्दल ICMR, राज्य तसंच केंद्राच्या टास्क फोर्सने चर्चा करून आम्हाला मार्गदर्शन केलं, तर आम्हालाही तसा विचार करता येईल. याबद्दलच्या सूचना आम्ही त्यांच्याकडे पाठवल्या आहेत, असं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

10:16 (IST) 28 Jan 2022
देशात २१ लाखांच्या वर उपचाराधीन रुग्ण; रुग्ण बरे होण्याचा दर ९३.६० टक्के

नवे करोनाबाधित : २ लाख ५१ हजार २०९

उपचाराधीन रुग्णसंख्या : २१ लाख ०५ हजार ६११

रुग्ण बरे होण्याचा दर (recovery rate): ९३.६०%

रुग्ण बाधित आढळण्याचा दैनंदिन दर (Daily positivity rate): १५.८८ %

रुग्ण बाधित आढळण्याचा साप्ताहिक दर (Weekly positivity rate): १७.४७%

(सदर आकडेवारी सकाळी ९ वाजता संपलेल्या २४ तासांतली आहे.)

10:06 (IST) 28 Jan 2022
ओमायक्रॉनच्या नव्या उपप्रकाराने वाढवली चिंता; आधीच्या प्रकारापेक्षाही अधिक संसर्गजन्य

सध्या भारतात आढळणाऱ्या बहुतांश ओमायक्रॉन बाधितांमध्ये BA.2 या ओमायक्रॉनच्याच उपप्रकाराचा संसर्ग अधिक आढळून आला आहे. हा उपप्रकार ओमायक्रॉनचा आधीचा विषाणूप्रकार BA.1 पेक्षा अधिक संसर्गजन्य असल्याचं आढळून आलं आहे. राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे संचालक डॉ. एस. के. सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या करोना रुग्णांमध्ये ओमायक्रॉनचे BA.1, BA.2 असे दोन उपप्रकार आढळत आहेत. त्यापैकी BA.2 हा जास्त प्रमाणात आढळत असून तो अधिक संसर्गजन्य आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय आज दुपारी दक्षिणेकडील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत करोना परिस्थितीविषयी उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत

Story img Loader