देशात करोना महामारीची तिसरी लाट आली आहे. दररोज मोठ्याप्रमाणावर नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत, शिवाय करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. करोनासोबतच ओमायक्रॉनबाधितही रूग्णांची नोंद होत आहे. मागील २४ तासात देशभरात १,६८ हजार ०६३ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, २७७ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याशिवाय ६९ हजार ९५९ रूग्ण करोनामधून बरे दखील झालाची माहिती समोर आली आहे. तर, देशातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या ८ लाख २१ हजार ४४६ वर पोहचली आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट १०.६४ टक्के आहे. देशातील एकूण ओमायक्रॉनबाधितांची संख्या ४ हजार ४६१ वर पोहचली आहे.
काल देशभरात १ लाख ६९ हजार ७२३ नवीन करोनाधित आढळून आले होते. या तुलनेत आज आढळून आलेल्या करोनाबाधितांची संख्या ही ११ हजार ६६० रूग्णांनी कमी आहे.

तर, देशात करोना बाधितांच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे आणि या महिन्याच्या अखेरीस ते करोनाची तिसरी लाट पीकवर असण्याची शक्यता आहे. आयआयटी कानपूरचे प्राध्यापक महेंद्र अग्रवाल यांनी सांगितले आहे की, या काळात देशात दररोज ४ ते ८ लाख रुग्ण संख्या आढळू शकते. इतकेच नाही तर कडक निर्बंधांमुळे ही लाट काही काळानंतर नक्कीच येईल, पण नंतर ती दीर्घकाळ राहील, असा अंदाजही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. लॉकडाउनसारख्या निर्बंधांशिवाय करोना विषाणूचा संसर्ग थांबणार नाही, हे या अंदाजावरून स्पष्ट होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covid 19 india reports 168063 fresh cases and 277 deaths in the last 24 hours msr
Show comments