Covid 19 Update India : कोरोनाबाबतची चिंताजनक आकडेवारी नुकतीच समोर आली आहे. गेल्या २४ तासात देशात तब्बल ४,४३५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. गेल्या १६३ दिवसांमधील ही सर्वाधिक संख्या आहे. गेल्या २४ तासांत आढळलेल्या नवीन रुग्णांसह देशातील एकूण सक्रीय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता २३,०९१ वर गेली आहे. सक्रीय रुग्ण म्हणजे, ज्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, एका बाजूला नव्या रुग्णांची संख्या वाढत असताना मृतांची संख्यादेखील वाढली आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात कोरोनामुळे १५ रुग्णांनी जीव गमावला आहे. यापैकी महाराष्ट्र आणि केरळमध्ये प्रत्येकी चार मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. तर छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, पुद्दुचेरी आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे ५,३०,९१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मृत्यूंचं प्रमाण वाढलं

मृत्यूंच्या आकडेवारीबद्दल सांगायचे झाल्यास गेल्या चार दिवसात हे प्रमाण २०० टक्क्यांनी वाढलं आहे. गेल्या चार दिवसात देशात कोरोनामुळे ४० नागरिकांनी जीव गमावला आहे. १ एप्रिल रोजी पाच, २ एप्रिल रोजी ११, ३ एप्रिल रोजी नऊ आणि ४ एप्रिल रोजी १४ कोरोनाबाधितांनी जीव गमावला आहे.

हे ही वाचा >> पाकिस्तान भीषण संकटाच्या उंबरठ्यावर; ३५ टक्के महागाईचा दर कमी करण्यासाठी केंद्रीय बँकेचा मोठा निर्णय!

गेल्या २४ तासात जर्मनीत ११० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर अमेरिकेत ही संख्या ५४ इतकी आहे. दिवसभरात रशियात ३८, तर पोलंडमध्ये १७ कोरोनाबाधितांनी जीव गमावला आहे.

Story img Loader