COVID 19 is not over Tedros warns World Health Assembly: जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेड्रोस गेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी जागतिक आरोग्य परिषदेचं उद्घाटन आपल्या भाषणाने केलं. जगभरातील १९४ देशांचा सहभाग असणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेच्या सुरुवातीलाच गेब्रेयसस यांनी करोनापासून सावध राहण्याचा सल्ला जगभरातील देशांना दिलाय.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
२०१९ नंतर पहिल्यांदाच प्रत्यक्ष उपस्थितीत या परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. याच परिषदेच्या उद्घाटनाच्या वेळी भाषण देताना गेब्रेयसस यांनी मागील दोन वर्षांमध्ये जगाने शतकातील सर्वात मोठ्या आरोग्य समस्येला तोंड दिल्याचं उल्लेख केला. त्यांनी आतापर्यंतची परिस्थिती, भविष्यातील आव्हान आणि सध्या अनेक देशांमध्ये उठवण्यात आलेल्या निर्बंधांचा उल्लेख आपल्या भाषणात केला.
विषाणूबद्दल आपण काहीच सांगू शकत नाही
सर्वात कमी लसीकरण झालेल्या आफ्रिका सारख्या खंडामध्ये करोना मृतांची संख्या वाढत असल्याचा उल्लेखही यावेळी गेब्रेयसस यांनी केला. “या विषाणूने प्रत्येक वळणावर आपल्याला पराभूत केलंय. अनेक समाजांमध्ये या विषाणूने पुन्हा पुन्हा धुमाकूळ घातलाय. खरं तर अजूनही आपण हा विषाणू या पुढे कसा आणि किती वेगाने पसरेल हे सांगू शकत नाही,” असा इशारा गेब्रेयसस यांनी दिलाय.
केवळ ५७ देशांमध्ये…
जागतिक लोकसंख्येच्या ६० टक्के लोकांचं लसीकरण पूर्ण झाल्याचं सांगतानाच कमी उत्पन्न असणाऱ्या देशांमधील एक बिलियन लोकांचं लसीकरण अद्याप झालेलं नाही, असंही गेब्रेयसस म्हणाले. “जोपर्यंत करोनाचा सर्व ठिकाणांहून नाश होत नाही तोपर्यंत तो संपला असं म्हणता येणार नाही,” असा उल्लेख करताना गेब्रेयसस यांनी, “जगातील केवळ ५७ देशांमधील ७० टक्के लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण झालंय. यापैकी सर्वच देश हे सधन देश आहेत,” असं गेब्रेयसस म्हणाले.
अनेक देशांमध्ये राजकीय इच्छाशक्ती कमी पडतेय
करोनाचा फैलाव वाढणं म्हणजे मृतांची संख्या वाढणं आणि नवीन व्हेरिएंट निर्मितीची शक्यता अधिक बळकट होणं असं साधं गणित असल्याचं गेब्रेयसस यांनी सांगितलं. “विषाणू बदलत राहणार त्याप्रमाणे आपण आपली तयारी ठेवली पाहिजे,” असंही गेब्रेयसस म्हणाले. अनेक देशांमध्ये लसीकरणासंदर्भात राजकीय इच्छाशक्ती कमी पडत असल्याबद्दल गेब्रेयसस यांनी खेद व्यक्त केला. प्रत्यक्ष लसीकरण आणि त्यासाठीच्या आर्थिक तरतूदीमध्ये जगभरातील अनेक देश समाधानकारक कामगिरी करत नसल्याचं गेब्रेयसस म्हणाले.
अनेक ठिकाणी परिस्थिती सर्वसामान्य वाटतेय पण…
“करोना संपलाय का? नाही, तो नक्कीच संपलेला नाही. मला माहितीय की तुम्हाला हे ऐकायला आवडणार नाही आणि मी सुद्धा हा मेसेज देण्यासाठी येथे आलेलो नाही,” असं म्हणत गेब्रेयसस यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. अनेक देशांमध्ये करोना निर्बंध उठवण्यात आल्याचा उल्लेख करत बऱ्याच देशांमध्ये जनजीवन सर्वसामान्य झाल्याचं चित्र दिसत असल्याचं सांगितलं. “अनेक देशांत निर्बंध उठवलेत, परिस्थिती सामान्य झाल्यासारखं वाटतंय पण तसं नाहीय. अनेक देशांमध्ये आजही लसीकरण हे ७० टक्क्यांहून कमी आहे,” असा उल्लेख गेब्रेयसस यांनी केलाय. जगातील ७० देशांमध्ये पुन्हा एकदा करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याकडेही गेब्रेयसस यांनी लक्ष वेधलं. “सध्या चाचण्यांची संख्या जगभरामध्ये कमी झाल्याचं दिसून येत आहे,” असंही गेब्रेयसस म्हणाले.
साथ अचानक गायब होणार नाही…
आपण ही जागतिक साथ रोखू शकतो का याबद्दल बोलताना गेब्रेयसस यांनी ही साथ आपोआप गायब होणार नाही, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील असं सांगितलं. “ही जागतिक साथ अचानक गायब होणार नाही. मात्र आपण तिला संपवू शकतो. आपल्याकडे यासंदर्भात ज्ञान आहे, मार्ग आहे. विज्ञानामुळे आपल्याला यासंदर्भात बळकटी मिळत आहे,” असं सांगताना गेब्रेयसस यांनी जागतिक स्तरावर ७० टक्के लसीकरणाचं उद्दीष्ट सर्वांनी एकत्र मिळून पूर्ण करण्याची गरज असल्याचं अधोरेखित केलं.