दक्षिण आफ्रिकेत प्रथम नोंदवलेला करोनाचा नवीन प्रकार, Omicron (B1.1.529) मुळे निर्माण झालेली सौम्य तिसरी लाट, जानेवारीमध्ये देशात येण्याची शक्यता आहे आणि संक्रमण कमी होण्यापूर्वी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ते शिखरावर पोहोचण्याची शक्यता आहे, अशी माहिती IIT-हैदराबाद आणि IIT कानपूरच्या संशोधकांनी शनिवारी विकसित केलेल्या महामारीच्या सुप्रसिद्ध सूत्र गणितीय मॉडेलच्या अभ्यासानंतर समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दक्षिण आफ्रिकेतील ओमायक्रॉन प्रकाराच्या उद्रेकाच्या सध्याच्या परिस्थितीवर आधारित SUTRA मॉडेलच्या प्राथमिक अंदाजानुसार, या वर्षाच्या मार्च/एप्रिलमध्ये झालेल्या लक्षणीय डेल्टा लाटेच्या तुलनेत तिसरी लाट सौम्य असेल. या वर्षाच्या मार्च/एप्रिलमध्ये दररोज सुमारे ४ लाख रुग्ण आढळत असताना दुसऱ्या लाटेदरम्यान दररोज कोविड संसर्गाने उच्चांक गाठला होता. SUTRA प्रोजेक्शन मॉडेलने सूचित केले आहे की ओमायक्रॉनमुळे येणारी तिसरी लाट जानेवारी ते मार्च दरम्यान दररोज सुमारे २ लाख कोविड संसर्गाच्या शिखरावर पोहोचू शकते.

हेही वाचा – ‘या’ राज्यानं करून दाखवलं; मिळवला सर्वप्रथम पूर्ण लसीकरण करण्याचा मान!

“हे अंदाज आरोग्य अधिकारी आणि सरकारांना येत्या काही महिन्यांच्या तयारीसाठी दिशा देण्यासाठी आहेत. मला वाटते की भारतातील सरासरी दैनंदिन संसर्ग दीड लाख ते २ लाखांच्या दरम्यान असेल आणि ४ लाखांपर्यंत पोहोचू शकणार नाही किंवा ओलांडू शकणार नाही, जे दुसऱ्या लाटेदरम्यान झाले होते. तथापि, हे अंदाज अनेक निष्कर्षांवर आधारित आहेत, कारण ओमायक्रॉनबद्दलचा डेटा अगदी नवा आहे,” डॉ. एम. विद्यासागर, SERB राष्ट्रीय अध्यक्ष, IIT हैदराबाद यांनी सांगितले, ज्यांनी या सूत्र मॉडेलची स्थापना केली.

IIT कानपूरचे प्रमुख संशोधक, जे सूत्र मॉडेलचे सह-संस्थापक आहेत ते डॉ मनिंद्र अग्रवाल म्हणाले, “आतापर्यंतचे पुरावे असे सूचित करतात की पुढील वर्षाच्या सुरुवातीला भारतात सौम्य तिसरी लाट येईल. डेल्टा व्हेरिएंटच्या प्रसारादरम्यान निदर्शनास आल्याप्रमाणे, रात्रीचा कर्फ्यू तसंच सौम्य लॉकडाउन, गर्दीवर निर्बंध विषाणूच्या प्रसाराची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते, ज्यामुळे रुग्णसंख्याही नियंत्रणात राहील”.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covid 19 third wave expected in january claims iit kanpur after omicron data analysis vsk