देशात करोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. शनिवारी गेल्या २४ तासांत १ लाख ४० हजारांहून अधिक नवीन रुग्णांचा आकडा समोर आला आहे. सात महिन्यांनंतर सलग दुसऱ्या दिवशी एक लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा, १,४१,५२५ नवीन करोना बाधितांची नोंद झाली आहे. याआधी शुक्रवारी १ लाख १७ हजार नवीन करोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. देशात २८ डिसेंबरपासून प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. या ११ दिवसांत दररोज २० टक्के अधिक नवीन प्रकरणे समोर आली आहेत. तर यातील ४ दिवसांत करोनाच्या नवीन रुग्णांची वाढ ४० टक्क्यांहून अधिक आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in