भारतातील करोनाचे संकट थांबण्याचे नाव घेत नाही आहे. देशात करोनाची रुग्ण संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. गेल्या २४ तासांत ३७,५९३ नवीन करोना रुग्ण आढळले असून ६४८ करोनाबाधितांना आपला जीव गमावावा लागला आहे. सोमवारी २५,४६७ करोना बाधितांची नोंद झाली होती. तर मंगळवारी ३४,१६९ लोक करोनातून बरे झाल्याने २७७६ सक्रिय रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मंगळवारच्या तुलनेत करोनाच्या प्रकरणांमध्ये सुमारे ४७ टक्के वाढ झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात सक्रिय प्रकरणांची संख्या अजूनही ३,२२,३२७ आहे. त्याचबरोबर देशात आतापर्यंत ५९.५५ कोटी लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. याशिवाय, देशात सध्याचा रिकव्हरी रेट ९७.६७ टक्के आहे आणि गेल्या २४ तासांमध्ये ३४१६९ लोक करोनापासून बरे झाले आहेत. मंगळवारी देशात करोनाची २५,४६७ नवीन प्रकरणे समोर आली आहेत.

करोनाच्या सुरुवातीपासून देशात महामारी सुरू झाल्यापासून एकूण तीन कोटी २५ लाख १२ हजार लोकांना संसर्ग झाला आहे. यापैकी ४ लाख ३५  हजार ७५८ लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३ कोटी १७ लाख ५४ हजार लोक बरे झाले आहेत. देशात करोना सक्रिय रुग्णांची संख्या तीन लाखांहून अधिक आहे. एकूण ३ लाख २२ हजार लोकांना अजूनही करोना विषाणूची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २४ ऑगस्टपर्यंत देशभरात करोना लसीचे ५९ कोटी ५५ लाख ४ हजार डोस देण्यात आले आहेत. मंगळवारी ६१.९० लाख लसी देण्यात आल्या. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) मते, आतापर्यंत ५१ कोटी ११ लाख करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मंगळवारी सुमारे १७.९२ लाख करोना नमुने चाचण्या करण्यात आल्या, ज्यांचा सकारात्मकता दर ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे.